Mumbai : भायखळा येथे पोलीस ठाण्याला आग, Video 
मुंबई

Mumbai : भायखळा येथे पोलीस ठाण्याला आग, Video

भायखळा पूर्व येथील हंसराज रोडवर असलेल्या एका मजली भायखळा पोलीस ठाण्याच्या इमारतीमध्ये आग लागल्याची घटना घडली.

Swapnil S

मुंबई : भायखळा पूर्व येथील हंसराज रोडवर असलेल्या एका मजली भायखळा पोलीस ठाण्याच्या इमारतीमध्ये आग लागल्याची घटना घडली. आपत्ती व्यवस्थापन कक्षाने दिलेल्या अहवालानुसार, रात्री ८:२० च्या सुमारास मुंबई अग्निशमन दलाला आगीची माहिती मिळाली आणि ८:२८ वाजता ही आग ‘लेव्हल १’ घोषित करण्यात आली.

अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, रात्री ९ च्या सुमारास आग आटोक्यात आणण्यात आली असून प्राथमिक अंदाजानुसार शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागली असावी. या घटनेत कोणतीही जीवितहानी किंवा दुखापत झालेली नाही.

पोलीस उपआयुक्त जयंत मीना यांनी सांगितले की, ‘भायखळा पोलीस ठाण्याच्या इमारतीमध्ये आगीची घटना घडली होती. अग्निशमन दलाने ही आग पूर्णपणे विझवली आहे.

(इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

मुंबई साखळी बॉम्बस्फोट प्रकरण : गँगस्टर अबू सालेमच्या मुदतपूर्व सुटकेची याचिका फेटाळली; सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय

Navi Mumbai : महापालिका पदभरती निकालाचा मार्ग मोकळा; संवर्गाचे स्कोअर कार्ड संकेतस्थळावर होणार जाहीर

Thane : खारफुटीतील भराव तात्काळ थांबवा! पोलीस आयुक्तांना NGT चा दणका, जिल्हाधिकाऱ्यांनाही फटकारले

Ulhasnagar : 'मी आमदार आहे, नगरसेवकाला विचारण्याची गरज नाही'; गोलमैदानातील विकासकामावरून आयलानी-पांडे आमनेसामने

Thane : गणेशोत्सवात अवजड वाहनांना 'नो एंट्री' विसर्जनाच्या पाच दिवसांत शहरात प्रवेशबंदी