मुंबई

उड्डाणपुलाचा मच्छिमारांना फटका? मार्वे मनोरीदरम्यान नवीन उड्डाणपूल बांधणार

मालाड मार्वे-मनोरी दरम्यान मुंबई महापालिकेने नवीन उड्डाणपूल बांधण्याचा निर्णय घेतला आहे.

Swapnil S

मुंबई : मालाड मार्वे-मनोरी दरम्यान मुंबई महापालिकेने नवीन उड्डाणपूल बांधण्याचा निर्णय घेतला आहे. मार्वे येथून मनोरी आणि जवळपासच्या ठिकाणी जाण्यासाठी मीरा रोड, भाईंदर-गोराईपर्यंत पश्चिम द्रूतगती महामार्गाद्वारे जावे लागते. या प्रवासासाठी सुमारे २९ किमीचा वळसा घालावा लागतो. मात्र मार्वे मनोरीदरम्यान उड्डाणपूल झाल्यास वेळ, पैसा व इंधनाची बचत होणार आहे. परंतु पुलामुळे मच्छिमारांवर परिणाम होणार का यासाठी पालिका अभ्यास करणार आहे.

गोराई, मनोरी, उत्तन व परिसरातील काही भाग पालिकेच्या अखत्यारित येतो. या भागांना जोडण्यासाठी येथे पूल बांधणे अनेक वर्षांपासून प्रस्तावित आहे. एमसीझेडएमएच्या नुकत्याच झालेल्या १५७ व्या बैठकीत सीआरझेड परवानगीसाठी प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. त्यावर प्राधिकरणाने या पुलामुळे मत्स्यव्यवसाय करण्याऱ्या समुदायांवर होणारे परिणाम तसेच त्यांच्यावरील आर्थिक व सामाजिक बदल याबाबत अभ्यास आवश्यक असून ही बाब पर्यावरण आघात मूल्यांकन अहवालामध्ये समविष्ट करण्यास पालिकेला सांगितले आहे.

१४ फेब्रुवारीला बैठक

१४ फेब्रुवारी २०२४ रोजी मुंबई पालिका के-पश्चिम कार्यालय इमारत, दुसरा मजला, पालीराम रस्ता, अंधेरी बेस्ट बस डेपोसमोर, स्वामी विवेकानंद मार्गाजवळ, अंधेरी पश्चिम येथे सायंकाळी ४ वाजता बैठक आयोजित करण्यात आली आहे.

Mumbai : स्नॅपचॅटवर मैत्री, व्हिडिओ कॉलचं रेकॉर्डिंग अन् ब्लॅकमेलिंग; तरुणीकडून ४० हजार उकळले, आरोपी पंजाबमधून अटकेत

Mumbai : मध्य रेल्वेच्या ४३ स्थानकांवर 'इमर्जन्सी मेडिकल रूम'

निबंधकांच्या मंजुरीनंतरच जन्म, मृत्यू नोंदणी रद्द; दुरुस्तीसाठी नवे कडक नियम

महसूल वाढीसाठी वित्त समितीची स्थापना; समितीच्या अध्यक्षपदी डॉ. विजय केळकर यांची नियुक्ती

Mumbai : दुसऱ्या टप्प्यात २९४ आस्थापनांना नोटीस; मराठी पाट्या प्रकरणी ९,७९८ आस्थापनांची झाडाझडती