मुंबई

पाच हजार एसी ई-बसेस एसटीच्या ताफ्यात लवकरच

या नवीन बसमुळे प्रवाशांना आरामदायक आणि पर्यावरणपूरक प्रवास करता येणे शक्य होणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

Swapnil S

मुंबई : एसटीच्या बसेस राज्याची जीवनवाहिनी असून या एसटीच्या चालक-वाहकांचे गावकऱ्यांशी कायमचे ऋणानुबंधाचे नाते निर्माण झाले आहे. ग्रामीण भागाच्या विकासात एसटीचे मोठे योगदान असून काळानुरूप एसटीमध्ये अनेक बदल झाले असून आता एसटीच्या ताफ्यात ५१५० संपूर्णपणे वातानुकूलित ई-बसेस दाखल होत आहेत. या नवीन बसमुळे प्रवाशांना आरामदायक आणि पर्यावरणपूरक प्रवास करता येणे शक्य होणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

एसटी महामंडळाने ५१५० वातानुकूलित ई-बसेस घेण्याचा धाडसी निर्णय घेतला असून त्यासाठी राज्यभरात १७३ पेक्षा जास्त बसस्थानकांवर ई-बस चार्जिंग स्टेशन्सची निर्मिती करण्यात येत आहे. या ३४ आसनी, वातानुकूलित ई-बसेस बोरिवली-ठाणे-नाशिक या मार्गावर धावणार असून याचा तिकीट दर सध्याच्या शिवशाही बसेस सारखाच असणार आहे. विशेष म्हणजे या बसमध्ये महिलांना ५० टक्के, ६५ ते ७५ वर्षांपर्यंतच्या ज्येष्ठ नागरिकांना ५० टक्के तर अमृत ज्येष्ठ नागरिकांना १०० टक्के तिकीट दरात सवलत देण्यात येत आहे.

ठाणे शहरातील खोपट बसस्थानकात आयोजित कार्यक्रमास आमदार प्रताप सरनाईक, माजी आमदार रवींद्र फाटक, परिवहन विभागाचे प्रधान सचिव पराग जैन-नैनोटिया, एसटी महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. माधव कुसेकर आदी मान्यवर उपस्थित होते.

अशा आहेत एसी ई-बसेस

३४ आसनी मिडी बस

संपूर्ण वातानुकूलित

एका चार्जिंगमध्ये २०० किमी प्रवास

केवळ २ तासांत पूर्ण चार्जिंग

तिकीट दर ( रुपये)

बोरिवली-नाशिक ४०५

ठाणे-नाशिक ३४०

सवलत

महिला व ६५-७५ वर्ष दरम्यानच्या ज्येष्ठ नागरिकांना ५० टक्के सवलत

अमृत ज्येष्ठ म्हणजेच ७५ वर्षांवरील नागरिकांना तिकिटात १०० टक्के सवलत

Maharashtra Assembly Elections Results 2024 LIVE: महाराष्ट्राचा महानिकाल! एकाच क्लिकवर बघा कल आणि निकाल

अपक्ष, बंडखोरांसाठी रस्सीखेच; महायुती, महाआघाडीत खलबते

राहुल गांधी, खर्गे यांनी माफी मागावी, अन्यथा कारवाईला सामोरे जावे; विनोद तावडे यांची नोटीस

...तोपर्यंत मतमोजणी केंद्र सोडू नका; शरद पवारांचा उमेदवारांना आदेश

झारखंडमध्ये आज मतमोजणी