मुंबई

माजी आमदार श्रीकांत सरमळकर यांचे निधन

Swapnil S

मुंबई : वांद्रे खेरवाडी येथील उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचे माजी नगरसेवक, माजी आमदार श्रीकांत सरमळकर यांचे सोमवारी पहाटे साडेसहा वाजता दीर्घ आजाराने निधन झाले. ते ७४ वर्षांचे होते. मंगळवारी २३ जानेवारीला सकाळी १०.३० वाजता त्यांच्या पार्थिवावर वांद्रे स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगी, जावई असा परिवार आहे.

सरमळकर हे १९८५ साली मुंबई महापालिकेत नगरसेवक म्हणून तर १९९० मध्ये ते वांद्रे पूर्व येथून आमदार म्हणून निवडून आले होते. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे निष्ठावंत शिवसैनिक म्हणून ओळख असलेल्या सरमळकर यांनी नारायण राणे यांच्यासोबत काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. मार्च २०११ मध्ये ते शिवसेनेत परतले होते. शिवसेनेच्या पहिल्या पिढीतील आक्रमक शिवसैनिकांमध्ये सरमळकर यांचा समावेश होता.

सरमळकर हे नगरसेवक असताना पालिका मुख्यालयाखाली त्यांना अज्ञात व्यक्तींकडून गोळ्या घालण्यात आल्या होत्या. गैरसमजातून या गोळ्या घालण्यात आल्या होत्या. गोळ्या कुणी घातल्या हे पुढे पोलिस तपासातही समजू शकले नाही. गेली ३०हून अधिक वर्ष सरमळकर यांच्या शरीरात बंदुकीच्या गोळ्या होत्या. शरीरात गोळ्या घेऊनच ते जगत होते, अशी माहिती सरमळकर यांचे सहकारी माजी नगरसेवक के. पी. नाईक यांनी दिली. सरमळकर यांचे पार्थिव मंगळवारी सकाळी सात वाजल्यापासून वांद्रे खेरवाडी, खेरनगर येथील श्रीकांत सरमळकर फाऊंडेशन कार्यालयात अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे.

'मंगलपर्व' आजपासून, मुंबईसह देशात गणेशोत्सवाचा जल्लोष

उद्या हार्बर, ट्रान्स-हार्बर मार्गावर मेगाब्लॉक नाही; मुख्य मार्गावर शनिवारी रात्रकालीन ब्लॉक

'लाडकी बहीण' योजनेचे अर्ज केवळ अंगणवाडी सेविकाच स्वीकारणार

Traffic Update: मुंबई-गोवा महामार्गावर चाकरमान्यांचे हाल सुरूच; गणेश भक्तांची १२ तास रखडपट्टी

निवडणुकीनंतरच महायुतीचा मुख्यमंत्री ठरेल - फडणवीस