मुंबई

सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी चार आरोपींना अटक

राहण्याचा पत्ता विचारला म्हणून त्यांनी गस्त घालणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यासह कर्मचाऱ्यांवर हल्ला केला

नवशक्ती Web Desk

मुंबई : सरकारी काामत अडथळा आणून पोलीस अधिकाऱ्यासह कर्मचाऱ्यावर हल्ला केल्याप्रकरणी चार आरोपींना बोरिवली आणि जुहू पोलिसांनी अटक केली. त्यात एका महिलेचा समावेश असून, अटकेनंतर या चौघांनाही लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. अटक आरोपींमध्ये महेश मोहन शेट्टी ऊर्फ कालू, तारीक मोहम्मद कासिम शेख, संगीता महावीर दास यांचा समावेश आहे. महेश शेट्टी हा बोरिवलीतील साईबाबानगर, रत्नाबाई चाळीत राहतो. काही दिवसांपूर्वी त्याच्याविरुद्ध बोरिवली पोलिसांनी मारामारीसह विनयभंग, शिवीगाळ करुन जिवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी एका गुन्ह्यांची नोंद केली होती.

गुन्हा दाखल होताच तो पळून गेला होता. त्याचा शोध सुरू असतानाच सोमवारी २५ सप्टेंबरला तो परिसरात गणेश विसर्जनासाठी येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यामुळे पोलिसांनी तिथे साध्या वेशात पाळत ठेवली होती. रात्री पावणेनऊ वाजता तिथे महेश आला असता त्याला पोलिसांनी ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला. यावेळी त्याने पोलिसांशी हुज्जत घालून त्यांना धक्काबुक्की करुन एका पोलीस शिपायाला जोरात लाथ मारली होती. पळून जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या महेशला पोलिसांनी ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात आणले. त्याच्याविरुद्ध गुन्हा नोंद करून नंतर त्याला पोलिसांनी अटक केली.

दुसर्‍या घटनेत तारीक शेख आणि संगीता दास या दोघांना जुहू पोलिसांनी अटक केली. ते दोघेही शनिवारी रात्री पावणेआठ वाजता एका रिक्षात बसले होते. त्यांची विचारपूस करुन त्यांचे नाव आणि राहण्याचा पत्ता विचारला म्हणून त्यांनी गस्त घालणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यासह कर्मचाऱ्यांवर हल्ला केला होता.

पंतप्रधान मोदींना ओमानचा सर्वोच्च नागरी सन्मान ‘ऑर्डर ऑफ ओमान’ प्रदान; मोदी म्हणाले, "हा सन्मान भारताच्या...

मोठी बातमी! अजित पवारांनी स्वीकारला माणिकराव कोकाटेंचा राजीनामा; अंतिम निर्णय मुख्यमंत्र्यांच्या हाती

मनरेगाचे नाव इतिहासजमा; VB-G RAM G विधेयक मंजूर, प्रियंका गांधींचा सरकारवर हल्लाबोल, "हे सर्व गरिबांच्या...

BMC Election : महायुतीतून अजित दादांची NCP आउट, भाजप-शिवसेनेचं १५० जागांवर ठरलं; अमित साटम यांनी दिली महत्त्वाची माहिती

मोठी बातमी! प्रज्ञा सातव यांचा अखेर भाजपमध्ये प्रवेश; म्हणाल्या - 'राजीव सातव यांचं अपूर्ण स्वप्न पूर्ण करण्यासाठी आणि देवाभाऊंच्या...