मुंबई

मुंबईत १९९३ सालच्या साखळी बॉम्बस्फोटातील चार आरोपींना अटक

प्रतिनिधी

मुंबईत १९९३ साली देशाला हादरवून सोडणारी साखळी बॉम्बस्फोटाची घटना घडली होती. याप्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत अनेक आरोपींना अटक केली असली तरी अनेक आरोपी फरार झाले होते. तर काही जणांनी विदेशात जाऊन आश्रय घेतला होता. याप्रकरणी गुजरात दहशतवादविरोधी पथकाने धडक कारवाई करीत चार आरोपींना अटक केली आहे. संबंधित आरोपी मागील २९ वर्षांपासून फरार होते. गुप्त माहितीच्या आधारे सापळा रचून पोलिसांनी या चारही आरोपींना अटक केली आहे.

अबू बकर, युसूफ भटका, शोएब कुरेशी उर्फ ​​शोएब बाबा आणि सय्यद कुरेशी अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. मुंबईत साखळी बॉम्बस्फोट घडवल्यानंतर चारही आरोपी फरार झाले होते. मागील जवळपास दोन दशकांहून अधिक काळापासून पोलीस या आरोपींचा शोध घेत होते. आरोपी अबू बकर हा मोहम्मद आणि मुस्तफा डोसाचा जवळचा सहकारी होता. मुंबईत बॉम्बस्फोट घडवल्यानंतर तो परदेशात पळून गेला होता.

संबंधित आरोपी काही दिवसांपूर्वी बनावट पासपोर्टच्या आधारे भारतातील अहमदाबाद येथे आले होते. याबाबतची माहिती गुजरात एटीएसला मिळाली. त्यानुसार पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे छापेमारी करत चारही आरोपींना अटक केली आहे. आरोपी अबू बकर हा मुंबईतील अब्दुल रेहमान स्ट्रीट परिसरात आपल्या कुटुंबासोबत राहत होता. त्याला राहत्या घरातून ताब्यात घेण्यात आले आहे.

मुंबईत घडवले होते १२ बॉम्बस्फोट

अटक केलेल्या सर्व आरोपींचा अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याच्याशी संबंध असल्याचे सूत्रांनी सांगितले. १२ मार्च १९९३ साली मुंबईतील विविध ठिकाणी १२ साखळी बॉम्बस्फोट घडवण्यात आले होते. यामध्ये अनेकांनी आपल्या जीवाभावाच्या माणसांना गमावले होते. अवघ्या सव्वा एक तासात मुंबईत १२ ठिकाणी हे साखळी बॉम्बस्फोट घडले होते.

दारूवरील व्हॅट, परवाना शुल्कवाढीला विरोध; सोमवारी राज्यातील हॉटेल्स, रेस्टॉरंट्स बंद

नवी मुंबई विमानतळावरून सप्टेंबरअखेरीस टेक ऑफ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन

Ahmedabad Plane Crash: इंधन पुरवठा बंद, विमान कोसळले; एएआयबीचा प्राथमिक अहवाल सादर, वैमानिकांमधील अखेरचा संवाद उघड

शरद पवार गटाचे नवे कॅप्टन शशिकांत शिंदे ? मंगळवारी प्रदेशाध्यक्ष पदाची घोषणा, जयंत पाटील पायउतार होणार

आयफोन, आयवॉचने कळणार स्त्री गर्भवती आहे का? कृत्रिम बुद्धिमत्तेची मदत