मुंबई

पावसाळी सहल जीवावर बेतली! मुंबईतील रिझवी कॉलेजच्या चार विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू

पावसाळी सहलीसाठी ३७ तरुण-तरुणी खालापूरच्या सोंदाई फोर्ट येथे ट्रेकिंगसाठी आले होते. दीड वाजण्याच्या सुमारास साई बंधारा पोखरवाडी येथे ते सर्व पोहायला उतरले. तीन वाजण्याच्या सुमारास एक मुलगा बुडत असताना त्याला वाचवण्यासाठी

Swapnil S

कर्जत : मुंबईतील रिझवी कॉलेजच्या चार विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू झाला आहे. पावसाळी सहलीसाठी खालापूर येथील धरणात ते पोहायला गेले होते.

पावसाळी सहलीसाठी ३७ तरुण-तरुणी खालापूरच्या सोंदाई फोर्ट येथे ट्रेकिंगसाठी आले होते. शुक्रवारी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास साई बंधारा पोखरवाडी येथे ते सर्व पोहायला उतरले. तीन वाजण्याच्या सुमारास एक मुलगा बुडत असताना त्याला वाचवण्यासाठी गेलेली अन्य तीन मुले बुडाली. बचाव पथकाने तीन मुलांचे मृतदेह चौक ग्रामीण रुग्णालय येथे आणले, तर एका तरुणाला बेशुद्धावस्थेत बाहेर काढून रुग्णालयात नेले. तेथे त्याचा मृत्यू झाला. आकाश माने (२६), रनोद बंदा (२०), एकलव्य सिंग (१७), ईशांत यादव (१३) अशी मृत मुलांची नावे आहेत. उपविभागीय अधिकारी विक्रम कदम पुढील तपास करीत आहेत.

Mumbai Local Mega Block : उद्या मध्य आणि हार्बर रेल्वेवर मेगाब्लॉक; अनेक लोकल रद्द, एक्स्प्रेस गाड्यांनाही फटका

मुंबईत उष्माघाताचा धोका; दुपारी ११ ते २ प्रकल्प कामे बंद ठेवा, नगरसेविकेचे महापालिका आयुक्तांना पत्र

'देव त्यांचं भलं करो'; तनुश्री दत्ताच्या आरोपांवर नाना पाटेकरांचा मुलगा मल्हारने सोडलं मौन

Mumbai : अजय देवगणच्या जुहूतील बंगल्यावर BMC चा हातोडा! अनधिकृत बांधकामावर कारवाई; नेमकं प्रकरण काय?

Delhi Protest : अभिजीत दिपकेंना आज न्यायालयात हजर करणार; AISA च्या नेहा बोरा यांची सुटका