मुंबई

क्रेडिट कार्डचे पॉईट रिडिम करण्यासाठी लिंक पाठवून फसवणुक

प्रतिनिधी

मुंबई: क्रेडिट कार्डचे पॉईट एक्सपायर होणार असून रिडीम करण्यासाठी लिंक पाठवून ऑनलाईन फसवणुक करणार्‍या एका सायबर ठगाला गुजरातच्या अहमदाबाद येथून व्ही. पी रोड पोलिसांनी अटक केली. साहिल मोहम्मद अशरफ मेमन असे या ठगाचे नाव सून अटकेनंतर त्याला लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. विपुल मनसुख तेजानी हे गिरगाव परिसरात राहत असून त्यांच्याकडे एका खाजगी बँकेचे क्रेडिट कार्ड आहे. १९ ऑक्टोंबरला त्यांना एका अज्ञात व्यक्तीने फोन करुन तो त्यांच्या बँकेतून बोलत असल्याचे सांगितले. त्यांचे क्रेडिट कार्ड पॉईट एक्सपायर होणार आहे. ते रिडीम करण्यासाठी त्याने त्यांना एक लिंक पाठवून त्यांच्या बँक खात्यासह क्रेडिट कार्डची माहिती घेतली होती. त्यानंतर त्याने ऑनलाईन ४७ हजार २५८ रुपये ट्रान्स्फर करुन त्यांची फसवणुक केली होती. फसवणुकीचा हा प्रकार लक्षात येताच त्यांनी व्ही. पी रोड पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीनंतर पोलिसांनी फसवणुकीसह आयटी कलमांतर्गत गुन्हा नोंदवून आरोपी सायबर ठगांचा शोध सुरु केला होता. ही शोधमोहीम सुरु असतानाच या पथकाने अहमदाबाद येथून साहिल मेमन याला संशयित आरोपी म्हणून ताब्यात घेतले होते. चौकशीत या गुन्ह्यांत त्याचा सहभाग उघडकीस येताच त्याला पोलिसांनी अटक केली. तपासात तो रनपैसा पोर्टलचा रिटेलर आहे. त्याच्याकडून पोलिसांनी एक मोबाईल आणि दोन सिमकार्ड जप्त केले आहे. याच गुन्ह्यांत तो सध्या पोलीस कोठडीत असून त्याच्या अटकेने अशाच इतर काही फसवणुकीच्या गुन्ह्यांची उकल होण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे.

राज्यात 'महिला राज'ची चर्चा; सुप्रिया सुळे, रश्मी ठाकरे यांची नावे मुख्यमंत्रीपदासाठी चर्चेत

मुरबाडच्या जागेवर शिवसेना ठाकरे गटाचाही दावा; महाविकास आघाडीत रस्सीखेच वाढणार!

हिरे क्षेत्र गंभीर संकटात; गेल्या तीन वर्षांत आयात-निर्यातीत मोठी घट,'जीटीआरआय’चा दावा

नव्या सरकारच्या स्वागतासाठी मंत्रालयात स्वच्छता मोहीम

‘मला काहीतरी सांगायचंय’; मुख्यमंत्र्यांच्या जीवनावरील नाटक, लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीला