मुंबई

फ्लॅटसह गृहकर्जाच्या नावाने व्यावसायिकाची फसवणुक दोन खाजगी कंपन्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल

कंपनीला १४ लाख १८ हजार रुपये टोकन म्हणून दिले होते

प्रतिनिधी

मुंबई :फ्लॅटसह गृहकर्जाच्या नावाने एका व्यावसायिकाची फसवणुक केल्याप्रकरणी दोन खाजगी कंपन्याविरुद्ध पार्कसाईट पोलिसांनी गुन्हा नोंदविला आहे. त्यात वाधवा रेसीडेन्सी प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक नवीन मखिजा, संचालक भास्कर जैन आणि बिपीन पद्म शाह यांच्यासह एल ऍण्ड टी फायनान्स कंपनीच्या काही प्रतिनिधींचा समावेश आहे. मिहीर चंद्रकांत ठक्कर हे घाटकोपर परिसरात राहतात. आठ वर्षांपूर्वी त्यांनी विक्रोळी येथे सुरु असलेल्या वाधवा कंपनीच्या एका इमातीच्या प्रोजेक्टमध्ये १ कोटी ९७ लाख रुपयांचा ६२७ चौ. फुटाचा एक फ्लॅट बुक केला होता. कंपनीने ही जागा त्यांच्या मालकीची असून तिथे सर्व सुखसुविधा असलेली एक इमारत होणार असल्याचे सांगून त्यांचा विश्‍वास संपादन करण्याचा प्रयत्न केला होता.

फ्लॅटसाठी त्यांनी कंपनीला १४ लाख १८ हजार रुपये टोकन म्हणून दिले होते. तसेच गृहकर्जासाठी त्यांनी एल ऍण्ड टी हाऊसिंग फायनान्स लिमिटेडमध्ये अर्ज केला होता. जुलै २०१६ साली त्यांच्यासह वाधवा आणि एल ऍण्ड टी कंपनीत एक त्रिपक्षीय करार झाला होता. या करारानंतर फायनान्स कंपनीने त्यांच्या वतीने वाधवा कंपनीला १ कोटी ८७ लाख ३८ हजार रुपयांचे पेमेंट केले होते. गृहकर्जासाठी त्यांनी कंपनीला प्रोसेसिंग फी म्हणून ८६ हजार २५० रुपये तर गृहकर्जाचे हप्ते म्हणून सुमारे तेरा लाख रुपये भरले होते. पेमेंटनंतर त्यांना ऑगस्ट २०१७ रोजी फ्लॅटचा ताबा मिळणार होता.

मात्र दिलेल्या मुदतीत त्यांनी फ्लॅटचा ताबा दिला नाही. तसेच त्यांच्या फ्लॅटची परस्पर अन्य एका महिलेस विक्री करुन वाधवा कंपनीने त्यांची फसवणुक केली होती. फ्लॅटवरुन वाद झाल्याने त्यांनी फ्लॅटसाठी घेतलेले सुमारे २८ लाख रुपये परत करण्यास सांगितले होते. मात्र त्यांनी पैसे परत केले नाही.

अशा प्रकारे वाधवासह एल. ऍण्ड टी फायनान्स कंपनीच्या प्रतिनिधींनी त्यांना फ्लॅट खरेदीसह गृहकर्ज घेण्यास प्रवृत्त करुन त्यांची फसवणुक केली होती. हा प्रकार लक्षात येताच त्यांनी दोन्ही कंपनीविरुद्ध लोकल कोर्टात एक याचिका सादर केली होती. या याचिकेवर सुनावणी देताना कोर्टाने दोन्ही कंपन्याविरुद्ध गुन्हा नोंदवून तपास करण्याचे आदेश विक्रोळी पोलिसांना दिले होते. कोर्टाच्या आदेशानंतर पोलिसांनी मिहीर ठक्कर यांची जबानी नोंदवून तपास सुरु केला आहे.

राज्याच्या EV धोरणाला अपवाद! बॉम्बे उच्च न्यायालयातील ६३ न्यायमूर्तींसाठी नवीन पेट्रोल-डिझेल गाड्यांना परवानगी

गणेशोत्सवासाठी एसटीच्या ५ हजार जादा बसेस; कोकणात जाणाऱ्या प्रवाशांना दिलासा

कबुतरखाने तोडण्यास तात्पुरती मनाई; मुंबई उच्च न्यायालयाचे निर्देश

शाडू मातीच्या मूर्ती आता होणार ‘ऑनलाइन’ उपलब्ध; पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी BMC चे विशेष प्रयत्न

गेटवे ऑफ इंडियाजवळ प्रवासी जेट्टीला परवानगी; परिसरात सुविधा पुरवताना खबरदारी घेण्याचे हायकोर्टाचे सरकारला निर्देश