मुंबई

अर्थमंत्र्यांशी ओळख असल्याचे सांगून वयोवृद्धाची फसवणूक

बँकेचे कर्जाचे हप्ते भरता येत नसल्याने वन टाईम सेंटलमेंट करुन द्यावे अशी विनंती केली होती.

नवशक्ती Web Desk

मुंबई : कर्ज सेंटलमेंटच्या नावाने एका ६५ वर्षांच्या वयोवृद्धाची फसवणूक केल्याप्रकरणी दोन आरोपींविरुद्ध एमआयडीसी पोलिसांनी गुन्हा नोंदविला आहे. किरण शहा आणि कुशल एस मेहता अशी या दोघांची नावे असून, या दोघांचा पोलिसांकडून शोध सुरू आहे. लवकरच या दोघांची पोलिसाकडून चौकशी होणार आहे. गोरेगाव येथे तक्रारदार वयोवृद्ध त्यांच्या कुटुंबीयांसोबत राहतात. ते अंधेरीतील एका खासगी कंपनीत वरिष्ठ अधिकारी म्हणून कामाला होते. या कंपनीने एका खासगी बँकेतून २४ कोटीचे कर्ज घेतले होते; मात्र कंपनीला कर्जाचे हप्ते भरता आले नाही. या घटनेनंतर बँकेने त्यांना नोटीस पाठवून कायदेशीर कारवाई करण्याबाबत समज दिली होती. जून २०२१ त्यांचा कॉमन मित्र मनोज शहाने त्यांची ओळख किरण शहा आणि कुशल मेहता यांच्याशी करून दिली होती.

या दोघांनी त्यांची अर्थमंत्र्यांशी चांगली ओळख असून, त्यांचे मॅटर सेटल करून देतो असे सांगितले. त्यासाठी फी म्हणून त्यांनी त्यांच्याकडून नऊ लाख रुपये घेतले होते. त्यानंतर त्यांनी त्यांच्या कंपनीतून केंद्रीय अर्थमंत्रालयात एक पत्र पाठविले होते. त्यात त्यांनी कोव्हीड काळात बँकेचे कर्जाचे हप्ते भरता येत नसल्याने वन टाईम सेंटलमेंट करुन द्यावे अशी विनंती केली होती. त्यानंतर त्यांना सरकारी फी म्हणून २ लाख ३५ हजार रुपये जमा करण्यास सांगण्यात आले. ते स्वत: बँकेत गेले आणि त्यांनी अर्थ मंत्रालयाचे ते पत्र दाखवून वन टाईम सेंटलमेंटबाबत विचारणा केली होती. यावेळी बँकेने त्यांना ते पत्र बोगस असून त्यांना अर्थ मंत्रालयातून अशा प्रकारचे कुठलेही पत्र प्राप्त झाले नाही. त्यांनी सरकारी फी म्हणून दिलेली पावतीही बोगस होती. अशा प्रकारे किरण शहा आणि कुशल मेहता यांनी बँकेचे कर्ज सेंटलमेंट करुन देतो असे सांगून त्यांची ११ लाख ३५ हजाराची फसवणूक केली होती.

अयोध्येत २९ लाख दिव्यांची विक्रमी आरास! ‘गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’मध्ये नोंद

उपोषणकर्त्या शेतकऱ्याला घरी बोलावून पाजला ज्यूस; "किती ही सत्तेची मस्ती"...रोहित पवारांचा संजय शिरसाटांवर हल्लाबोल

Mumbai : घर बदलणं महागात पडलं! 'मूव्हर्स अँड पॅकर्स'च्या कर्मचाऱ्यांनी ६.८ लाखांचे सोन्याचे दागिने केले लंपास; गुन्हा दाखल

Mumbai : १५ वर्षांनंतर MMRDA चा निर्णय; वडाळा ट्रक टर्मिनल प्लॉटचा १,६२९ कोटींना लिलाव होणार

'मविआ'चा एल्गार; EC विरोधात १ नोव्हेंबरला विराट मोर्चा; एक कोटी घुसखोर मतदार कमी करा! केंद्रीय गृहमंत्र्यांना विरोधकांचे आवाहन