मुंबई

केवायसी अपडेटच्या नावाने व्यावसायिकाची फसवणूक

बँक खात्यातून तीन ऑनलाईन व्यवहार झाले

नवशक्ती Web Desk

मुंबई : केवायसी अपडेटच्या नावाने एका एक्सपोर्ट व्यावसायिकाची सुमारे पावणेतीन लाख रुपयांची ऑनलाईन फसवणूक झाल्याचा प्रकार पायधुनी परिसरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी पायधुनी पोलिसांनी अज्ञात सायबर ठगाविरुद्ध फसवणुकीसह आयटी कलमांतर्गत गुन्हा नोंदविला आहे. मोहम्मद इरफान मोहम्मद हुसैन मोतीवाला हे पायधुनी येथे राहत असून, त्यांचा एक्सपोर्टचा व्यवसाय आहे. ३ जुलैला त्यांना एका अज्ञात व्यक्तीने फोन करुन तो त्यांच्या बँकेतून बोलत असल्याचे सांगितले. त्यांच्या क्रेडिट कार्डवर जमा झालेले क्रेडिट रिवॉर्ड पॉईट त्यांच्यात खात्यात जमा होत नाही. त्यामुळे त्यांना केवायसी अपडेट करावे लागेल असे सांगून त्याने त्यांच्या कार्डची डिटेल्स मागितली. मात्र कामात व्यस्त असल्याने त्यांनी ती माहिती शेअर केली नाही. त्यानंतर त्यांना ६ जुलैला पुन्हा संबंधित व्यक्तीने फोन केला होता. त्यामुळे त्यांनी त्यांच्या आधार, पॅनकार्डसह क्रेडिट कार्डची माहिती त्याला शेअर केली होती. त्यानंतर त्यांना बँकेतून एक मॅसेज आला होता. हा मॅसेज व मोबाईलवर आलेले तीन ओटीपी त्याने त्याला दिला होता. त्यानंतर त्यांच्या बँक खात्यातून तीन ऑनलाईन व्यवहार होऊन २ लाख ८५ हजार रुपये डेबीट झाले होते.

मोठी बातमी! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर; दुबार मतदान रोखण्यासाठीही आणलं खास 'टूल'

सातारा जिल्ह्यातील 'राधा' म्हशीचा जगात डंका; सर्वात बुटकी म्हैस म्हणून 'गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड'मध्ये नोंद

ठाणे-बोरीवली टनेलच्या कामाला गती; देशातील सर्वात लांब शहरी बोगदा

कोइंबतूर विमानतळाजवळ गँगरेप प्रकरण; पोलिसांवर हल्ला करून पळण्याचा प्रयत्न करणारे तिघे अटकेत

डॉ. संपदा मुंडे मृत्यू प्रकरण : बेटी पढ़ी, पर बची नहीं... डॉक्टरांचे काम बंद आंदोलन; अधिकाऱ्यांचाही इशारा