मुंबई

BLO, SIR कामातून शिक्षकांना मुक्त करा; आझाद मैदानामध्ये हजारो शिक्षकांचे आंदोलन, वेतन कपातीच्या आदेशानंतरही आंदोलनात सहभागी

बीएलओ, एसआयआर कामातून शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना मुक्त करा, टीईटी सक्ती नको, शिक्षकांविरोधातील एफआयआर मागे घ्या, अशा विविध मागण्यांसाठी राज्यभरातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी आझाद मैदानात आंदोलन केले.

Swapnil S

मुंबई : बीएलओ, एसआयआर कामातून शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना मुक्त करा, टीईटी सक्ती नको, शिक्षकांविरोधातील एफआयआर मागे घ्या, अशा विविध मागण्यांसाठी राज्यभरातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी आझाद मैदानात आंदोलन केले. शिक्षण विभागाने वेतन कपातीचे आदेश काढल्यानंतरही हजारो शिक्षक आंदोलनात सहभागी झाले.

शाळा बंद आंदोलनात प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक संघटना, बीएलओ ड्युटी अन्याय निवारण मंच, बृहन्मुंबई माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षकेतर कर्मचारी संघटना, शिक्षक महासंघ मुंबई कोकण विभाग, महामुंबई शिक्षण संस्था, मुंबई (बृहन्मुंबई) माध्यमिक (उच्च माध्यमिक) शाळा मुख्याध्यापक संघटना, मुंबई आणि उपनगर माध्यमिक शिक्षक संघ, महाराष्ट्र संगीत शिक्षक संघटना, शिक्षण बचाव मंच, प्रहार शिक्षक संघटना, आदर्श शिक्षक सेवा संघ, महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद आणि विविध संघटनांचे पदाधिकारी सहभागी झाले.

शिक्षकांना वर्गात शिकवू द्या, अशैक्षणिक कामे बंद करा, अशा घोषणा देत शिक्षक आझाद मैदानात दाखल होत होते. चुकीच्या संच मान्यतेमुळे अनेक शाळांमध्ये शिक्षकांची संख्या कमी झाल्याने त्याचा परिणाम अध्यापनावर होत आहे. याचा फटका विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेला बसत आहे. एसआयआर व बीएलओची जबाबदारी शिक्षकांऐवजी महाविद्यालयांतील एनएसएस स्वयंसेवक किंवा सेवानिवृत्त शिक्षकांकडे सोपविण्यात यावी. शिक्षकांना अध्यापनासाठी पुरेसा वेळ मिळावा आणि न्यायालयीन निर्णयांचा सन्मान राखला जावा, अशी मागणी करत राज्य सरकारच्या नव्या पदोन्नती धोरणावरही शिक्षकांनी नाराजी व्यक्त केली आहे.

आंदोलक शिक्षकांच्या शिष्टमंडळाने शिक्षण मंत्री दादा भुसे यांना त्यांच्या मागण्यांसदर्भातील निवेदन दिले. यावेळी त्यांनी शिक्षकांच्या मागण्या सोडविण्यासाठी प्रयत्न करण्यात येईल, असे आश्वासन दिले.

आमदारांनी घेतली आंदोलनकर्त्यांची भेट

शिक्षक आमदार ज. मो. अभ्यंकर आणि आमदार अभिजित पाटील यांनी आंदोलनाला भेट देऊन आंदोलनकर्त्यांशी संवाद साधला. शिक्षकांच्या मागण्या विधिमंडळात प्रभावीपणे मांडू, असे आश्वासन त्यांनी दिले. शिक्षकांसाठी स्वतंत्र टीईटी परीक्षा आयोजित करण्यासाठी सरकारकडे पाठपुरावा करू, तसेच बीएलओ व एसआयआर ही अशैक्षणिक कामे रद्द करण्यासंदर्भातील मुद्दे विधान परिषदेमध्ये मांडल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

(इंग्रजीत वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

धरणे भरली, मात्र घागर रिकामीच! जलउद्वाहन केंद्रांतील गाळामुळे ठाण्याचा पाणीपुरवठा विस्कळीत; कळवा, मुंब्रा, घोडबंदरसह अनेक भागांत कमी दाबाने पाणी

पोलीस बंदोबस्तात KDMC रुग्णालयांतील सेवा पूर्ववत; डॉक्टरांच्या सुरक्षेसाठी कायमस्वरूपी उपाययोजनांचे आश्वासन

ठाणे कोस्टल रोडच्या कामाला वेग; चौदा महिन्यांत ७५ टक्के पायाभरणी पूर्ण

सोनम वांगचूक यांच्या आंदोलनाला शिवसेना ठाकरे गटाचा पाठिंबा

Satara : महाबळेश्वरमध्ये पर्यटकाची हत्या; चारही आरोपींना अटक