मुंबई

पालिका रुग्णालयात मुंबईकरांना मोफत उपचार; १ एप्रिलपासून झीरो प्रिस्क्रिप्शन पॉलिसीची अंमलबजावणी -एकनाथ शिंदे

पालिकेच्या रुग्णालयात मुंबईकरांना मोफत उपचार मिळणार आहे. १ एप्रिलपासून झीरो प्रिस्क्रिप्शन पॉलिसीची अंमलबजावणी होणार असल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.

Swapnil S

मुंबई : पालिकेच्या रुग्णालयात मुंबईकरांना मोफत उपचार मिळणार आहे. १ एप्रिलपासून झीरो प्रिस्क्रिप्शन पॉलिसीची अंमलबजावणी होणार असल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. वरळी इंजिनिअर हब येथील आपला दवाखान्याला भेट दिली, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी त्यांनी दवाखान्याची पाहणी करताना तपासणीसाठी आलेल्या रुग्णांशी देखील त्यांनी संवाद साधला. दरम्यान, झीरो प्रिस्क्रिप्शन पॉलिसी एप्रिलपासून सुरू होणार असून यासाठी १५०० कोटी रुपयांची तरतूद केल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

मुंबईकरांच्या आरोग्य उपचारावरील खर्च कमी करण्यासाठी आमचा प्रयत्न आहे. आरोग्य आपल्या दारी मोहीम सुरू करण्यात आली असून या मोहिमेतून घरोघरी जाऊन आरोग्य तपासणी करण्यात येणार असल्याचे ते म्हणाले. वरळीतील अभियांत्रिकी संकुलातील आपला दवाखान्यातील, स्टोर रूम, औषध कक्ष, तपासणी खोली, स्वच्छतागृह यांची पाहणी केली.

यावेळी मुंबई शहर पालक मंत्री दीपक केसरकर, मुंबई उपनगर पालक मंत्री मंगलप्रभात लोढा, मुंबई महापालिका आयुक्त डॉ. इक्बाल सिंह चहल, अतिरिक्त आयुक्त पी वेलरासू , डॉ. सुधाकर शिंदे, पालिकेच्या सार्वजनिक आरोग्य अधिकारी डॉ. दक्षा शहा आदी उपस्थित होते.

४२ लाख लाभार्थ्यांना उपचार!

मुंबईकरांना उपचारासाठी घराजवळच सोय व्हावी या संकल्पनेतून आपला दवाखाना मुंबईत २२६ ठिकाणी सुरू करण्यात आले आहेत. आतापर्यंत ४२ लाख नागरिकांनी त्याचा लाभ घेतला आहे. याठिकाणी उपचार मोफत, कॅशलेस,पेपरलेस मिळत आहेत.

भारतीय जहाजांसाठी १२,९८० कोटींचे विमा संरक्षण; मॅरिटाइम फंडला केंद्र सरकारची मंजुरी

अदानींनी अंबानींना मागे टाकले; गौतम अदानी ठरले आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती

केंद्र सरकारचा निर्णय; ‘आधार' ॲपची सक्ती नाही, प्री-इन्स्टॉलचा प्रस्ताव रद्द

Dhule : 'कोणीतरी ओढत नेतंय'? १८ वर्षीय तरुणी दिवसाढवळ्या बेपत्ता; CCTV मधील दृश्यांमुळे नागरिक हैराण

पवन खेडा यांना सर्वोच्च न्यायालयाचा दिलासा नाही; अटकपूर्व जामिनासाठी आसाम न्यायालयात जाण्याचे निर्देश