५० खोकेची घोषणा दिली तर ठोसा लगावू; गणेश खणकर यांचा ठाकरे सेनेला इशारा 
मुंबई

५० खोकेची घोषणा दिली तर ठोसा लगावू; गणेश खणकर यांचा ठाकरे सेनेला इशारा

विरोधकांचे सभागृहातील वर्तन दुर्दैवी आहे. शिंदेसेनेचे नगरसेवक हे महायुतीचा भाग असून यापुढे ५० खोके अशी घोषणा दिली तर ठोसाच लगावू, अशा शब्दांत सभागृह नेते गणेश खणकर यांनी ठाकरे सेनेच्या नगरसेवकांना इशारा दिला.

Swapnil S

मुंबई : विरोधकांचे सभागृहातील वर्तन दुर्दैवी आहे. शिंदेसेनेचे नगरसेवक हे महायुतीचा भाग असून यापुढे ५० खोके अशी घोषणा दिली तर ठोसाच लगावू, अशा शब्दांत सभागृह नेते गणेश खणकर यांनी ठाकरे सेनेच्या नगरसेवकांना इशारा दिला. विरोधकांकडून असे प्रकार वारंवार घडत असून महायुतीच्या नगरसेवकांनी तयार रहा, सत्ताधारी बाकावरून विरोधकांच्या बाकापर्यंत जाण्याची तयारी ठेवा, असा सल्ला खणकर यांनी महायुतीच्या नगरसेवकांना दिला.

ईडी कोणाच्या घरी येऊ नये, अशी देवाकडे प्रार्थना करते, परंतु आमच्या घरी ईडी आली छापेमारी केली काही भेटले नाही, मात्र मातोश्रीने किती खोके घेतले आणि मातोश्री दोन कसे झाले अशी पोलखोल एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या नगरसेविका यामिनी जाधव यांनी सभागृहात केली.

मुंबई महापालिकेत गेल्या काही दिवसांपासून मानापमान नाट्य रंगत असून त्याचा प्रत्यय सोमवारी झालेल्या सभागृहात आला. चिटणीस विभागाकडून फोन आला आणि महापौर दालनात बैठक असल्याचे सांगण्यात आल्याचे विरोधी पक्षनेते किशोरी पेडणेकर यांनी सभागृहात सांगितले. महापौर दालनात गेले असता, एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे गटनेते अमय घोले काही नगरसेवकांसह दालनात पोहोचले. यावेळी विरोधी पक्षनेत्यांना प्राधान्य न देता विरोधी पक्षनेत्यांना अँटी चेंबरमध्ये बसवण्यास सांगितले. याच मुद्द्यावरून किशोरी पेडणेकर यांनी सभागृहात हरकतीचा मुद्दा उपस्थित करत विरोधकांसह गटनेत्यांचाही अपमान झाल्याचे स्पष्ट करत सभात्यागच केला. मात्र असा कोणताही अपमान झाला नाही. त्यांना आदरच देण्यात आला असून हरकतीच्या मुद्द्यात तथ्य नसल्याचे महापौरांनी सभागृहात स्पष्ट केले.

सोमवारी दुपारी अडीच वाजता महापौर दालनात महापौर रितू तावडे यांनी विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर यांच्यासह काँग्रेस, मनसे, समाजवादी पार्टी गटनेत्यांची बैठक बोलावली होती.

अशासकीय भाषा वापरणाऱ्यांवर कारवाई करा

मानापमान नाट्यावरून चित्र रंगले असतानाच महापालिका सभागृहात अशासकीय भाषा वापरणाऱ्यांवर कारवाई करा. विरोधी पक्षातील नगरसेवक अशासकीय भाषा वापरत असल्याने ते योग्य नसून कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी शिवसेना शिंदे गटाच्या नगरसेविका यामिनी जाधव यांनी महापालिका सभागृहात केली.

भारताची रशिया, यूएईकडून तेल खरेदीत मोठी वाढ; होर्मुझ सामुद्रधुनीतील वाहतूक पूर्ववत होण्यापूर्वीचा दिलासा

Mumbai : एचपीव्ही लसीकरणामुळे गर्भाशय कर्करोगावर नियंत्रण; केईएम रुग्णालयात २८२ लाभार्थ्यांना एचपीव्हीची मात्रा

Mumbai Rain : मेघगर्जनेसह पावसाचे जोरदार पुनरागमन! वांद्रे-वरळीसह अनेक भागांत मुसळधार सरी, ऑरेंज अलर्ट जारी

'मुलगा अडथळा ठरतोय'; प्रियकराच्या सांगण्यावरून आईने घेतला दोन वर्षांच्या चिमुकल्याचा जीव

NEET UG 2026 Re-Exam : फ्लश टँकमध्ये मोबाईल लपवून परीक्षेत कॉपीचा प्रयत्न; १८ वर्षीय विद्यार्थ्याला अटक