मुंबई

७० लाखांच्या फसवणुकीप्रकरणी चारजणांच्या टोळीस अटक

लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली

नवशक्ती Web Desk

मुंबई : सुमारे ७० लाखांच्या फसवणुकीप्रकरणी चारजणांच्या एका टोळीला दिडोंशी पोलिसांनी अटक केली. अतित निरालेबावू गौर, रियान ऊर्फ राकेश ऊर्फ रेहान इक्बाल शेख, सौरभ राजेश दुबे ऊर्फ सम्राट अशी या तिघांची नावे असून, अटकेनंतर या तिघांनाही बोरिवलीतील लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. या गुन्ह्यांत इतर दोघांचा सहभाग उघडकीस आला असून, त्यांच्या अटकेसाठी आता पोलिसांनी विशेष मोहीम सुरू केली आहे. उत्तरप्रदेशचा रहिवाशी असलेल्या तक्रारदार अंधेरीतील एका हॉटेलमध्ये मॅनेजर म्हणून काम करत होता. हॉटेलमध्ये काम करताना त्याची अशफाक अली शेखशी ओळख झाली होती. त्याचा मोबाईल विक्रीचा व्यवसाय होता.

यावेळी त्याने त्याला एका खासगी कंपनीविषयी माहिती देताना ही कंपनी जास्त व्याजदराने रोखीने पैसे देत असल्याचे सांगितले होते. कंपनीत किमान ७० लाखांची गुंतवणूक केल्यास त्याला अवघ्या दोन तासांत एक कोटी रुपये मिळतील. सुरुवातीला त्याला त्याच्यावर विश्‍वास बसला नाही; मात्र त्याने तो स्वत: कंपनीत गुंतवणूक करत असून, त्यातून त्याला चांगला फायदा झाल्याचे सांगितले. त्याच्या बँकेचे स्टेटमेंटसह इतर कागदपत्रे दाखविल्यानंतर रजनीश मिश्राला त्याच्यावर विश्‍वास बसला होता. त्यामुळे त्यानेही कंपनीत गुंतवणुकीचा निर्णय घेतला होता.

BCCI कडून महाभियोगची तयारी; कुणकुण लागताच मोहसीन नक्वींनी UAE बोर्डाकडे सुपूर्द केली ट्रॉफी : रिपोर्ट

आजपासून भारत आणि EFTA व्यापार करार अंमलात; पुढील १५ वर्षांत १०० अब्ज डॉलरची गुंतवणूक होणार

नवी मुंबई विमानतळाला अखेर ‘एअरोड्रोम परवाना’; ८ ऑक्टोबरला पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्‌घाटन

रिलायन्स इन्फ्रावर ‘ईडी’चे छापे; फेमा कायद्याचे उल्लंघन केल्याचा आरोप

गोकुळकडून दूध उत्पादकांना दिवाळी भेट; १३६ कोटींचा ‘दरफरक’ जमा होणार