मुंबई

सिद्धू मुसेवालाच्या खून प्रकरणात गवळी गॅंगच कनेक्शन

प्रतिनिधी

पंजाबी गायक सिद्धू मुसेवालाच्या खून प्रकरणाचे धागेदोरे महाराष्ट्रातील कुख्यात गुंड अरुण गवळी टोळीशी जोडले गेले आहेत. पंजाब पोलिसांनी उलगडा केलेल्या या प्रकरणात आठ शार्पशूटर्सनी मिळून मुसेवालाची हत्या केल्याचा अंदाज पोलिसांनी पुराव्यानुसार बांधला आहे. यापैकी संतोष जाधव हा गवळी टोळीचा हस्तक असल्याची माहिती समोर आली असून, तो पुण्याचा रहिवासी आहे. २९ मे रोजी मुसेवालाच्या हत्येमध्ये त्याचा सहभाग होता.

संतोष जाधव याला खास मुंबईहून पंजाबला बोलावण्यात आले होते. त्याच्यासोबत महाराष्ट्राचा सौरभ महाकाळही होता. याप्रकरणी पंजाब पोलिसांनी महाराष्ट्र पोलिसांशी माहितीचे आदानप्रदान केले असून, मुंबई पोलिसांकडून सहकार्यही मागितले आहे. सिद्धू मुसेवाला यांची रविवारी, २९ मे रोजी सायंकाळी मानसातील जवाहरके गावात हत्या करण्यात आली. मुसेवालावर सुमारे ४० राउंड गोळीबार करण्यात आला. मुसेवाला यांच्या शरीरावर १९ जखमा आढळल्या. त्यापैकी सात गोळ्या थेट मुसेवाला यांना लागल्या होत्या.

सिद्धू मुसेवाला खून प्रकरणात गँगस्टर लॉरेन्स टोळीचे नाव समोर येत होते. लॉरेन्स गँगचा कॅनडाचा गँगस्टर गोल्डी बार याने स्वतः याची जबाबदारी घेतली. त्यानंतर याच टोळीतील सचिन थापन बिश्नोई याने टीव्ही चॅनलवर फोन करून हत्येची जबाबदारी स्वीकारल्याचे सांगितले होते. त्यात आता गवळी टोळीचे नाव समोर आल्याने लॉरेन्स टोळीसह गवळी टोळीचाही खून प्रकरणात हात आहे की काय, अशी शक्यता व्यक्त होत आहे.

Maharashtra HSC Exam 2025 : पूरग्रस्त विद्यार्थ्यांना दिलासा; बारावीचा अर्ज भरण्यास मुदतवाढ

लॉरेन्स बिश्नोई गँग दहशतवादी संघटना म्हणून घोषित; कॅनडा सरकारचा मोठा निर्णय, टोळीसोबत व्यवहार केल्यास होणार शिक्षा

एका रात्रीत ३७ गायी, २० शेळ्यांचा बळी! पुरामुळे दुग्धव्यवसाय उद्ध्वस्त; धाराशिवच्या शेतकऱ्याचे ६० लाखांचे नुकसान, मदत अपुरी

वैष्णवी हगवणे प्रकरण : सासू-नणंदेचा पुणे न्यायालयाने फेटाळला जामीन; म्हणाले, "नऊ महिन्यांच्या बाळाची आई...

महाराष्ट्रात पावसाचे संकट; काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांची विशेष अधिवेशनाची मागणी