आरोपी भावेश भिंडेची याचिका फेटाळली 
मुंबई

Ghatkopar Hoarding Accident : आरोपी भावेश भिंडेची याचिका फेटाळली, गुन्हा रद्द करण्यास न्यायालयाचा नकार; जामीनही नाकारला

Swapnil S

मुंबई : घाटकोपर येथील महाकाय होर्डिंग दुर्घटनेप्रकरणी अटकेत असलेल्या मुख्य आरोपी आणि इगो मीडियाचा मालक भावेश भिंडे याला उच्च न्यायालयाने झटका दिला. न्यायमूर्ती भारती डांगरे आणि न्यायमूर्ती मंजुषा देशपांडे यांच्या खंडपीठाने भिंडे याने जामिनासाठी आणि गुन्हा रद्द करण्यासाठी दाखल केलेली याचिका फेटाळून लावली.

घाटकोपर येथील छेडा नगर येथील पेट्रोल पंपावर असलेल्या १२० बाय १२० फुटांचे भलेमोठ होर्डिंग कोसळले होते. या दुर्घटनेत १६ जणांना आपले प्राण गमवावे लागले होते. या प्रकरणी अटकेत असलेला मुख्य आरोपी आणि जाहिरात कंपनीचा संचालक भावेश भिंडे यांने पोलिसांनी आपल्याला बेकायदेशीरपणे ताब्यात ठेवल्याने अटक बेकायदा असल्याचा दावा करून जामिनाबरोबरच गुन्हा रद्द करण्यासाठी याचिका दाखल केली. या याचिकेवर न्या. भारती डांगरे आणि न्या. मंजुषा देशपांडे यांच्या खंडपीठासमोर शुक्रवारी सुनावणी झाली. खंडपीठाने दोन्ही पक्षांचा तपशीलवार युक्तिवाद ऐकल्यानंतर शुक्रवारी निर्णय राखून ठेवतानाच याचिका फेटाळून लावली.

अटक गैर असल्याचा वकिलाचा दावा

भिडेच्यावतीने ॲड. मर्चंट यांनी, घटना नैसर्गिक आपत्ती होती आणि त्यासाठी भिडेला जबाबदार धरून करण्यात आलेली अटक गैर असल्याचा दावा केला. फौजदारी प्रक्रिया संहितेच्या (सीआरपीसी) कलम ४१ अ अंतर्गत अटकेपूर्वी आरोपीला नोटीस बजावणे अनिवार्य आहे. पोलिसांनी नोटीस न बजावता भिंडे याला केलेली अटक गैर असल्याने गुन्हा रद्द करून जामीन द्यावा, अशी विनंती केली. तर मुख्य सरकारी वकील ॲड. हितेन वेणेगावकर यांनी याचिकेला आक्षेप घेत दुर्घटनेत सहभाग उघडकीस आल्यानंतरच अटक करण्यात आली असे म्हटले.

Jammu Kashmir Election : नंदनवनात आज अखेर मतदान; २४ जागांसाठी २१९ उमेदवार रिंगणात

One Nation, One Election ची अंमलबजावणी कधी? केंद्रीय गृहमंत्री अमित शहांचे मोठे विधान

सुप्रीम कोर्टाने रोखला 'बुलडोझर न्याय'! आमच्या परवानगीशिवाय एकही पाडकाम नको; पुढील सुनावणीपर्यंत आदेश

सगेसोयरे अधिसूचनेवर सरकारनियुक्त समित्यांचे काम सुरू; कोणत्याही समाजाची फसवणूक करणार नाही - मुख्यमंत्री

विधानसभा निवडणुकीची आचार संहिता कधी लागू होणार? गिरिश महाजनांनी वर्तवले भाकीत