मुंबई

मुंबईत ३३ कोटींची सोन्याची बिस्किटे जप्त

प्रतिनिधी

डीआरआयने ऑपरेशन ‘गोल्ड रश’अंतर्गत सुमारे ३३ कोटी रुपयांची सोन्याची बिस्किटे पकडली आहेत. सुमारे ६५.४६ किलो सोन्याची खेप ईशान्य देशांतून मुंबई-पाटणा-दिल्ली येथे तस्करीमार्गे आणण्यात आली होती.

मिझोराममधून मोठ्या प्रमाणावर सोन्याची तस्करी करून एक मोठी खेप भारतात येणार असल्याची माहिती डीआरआयला मिळाली होती. त्यानंतर ‘ऑपरेशन गोल्ड रश’ सुरू करण्यात आले होते. तस्करीसाठी देशांतर्गत कुरिअर आणि लॉजिस्टिक कंपनीचा वापर करण्यात आला होता. तस्करी करून आणण्यात येणाऱ्या सोन्याच्या खेप विविध प्रकारच्या घरगुती वस्तूंमध्ये लपवून आणण्यात आल्या होत्या. केलेल्या कारवाईत डीआरआयने महाराष्ट्रातील भिवंडी येथे ‘ऑपरेशन गोल्ड रश’अंतर्गत १२० सोन्याची बिस्किटे पकडली असून, ज्याचे वजन सुमारे १९.९३ किलो असून त्याची अंदाजे किंमत १०.१८ कोटी रुपये आहे.

परदेशातून मिझोराममध्ये आलेले आणि तेथून मुंबईत पोहोचलेल्या याच मालाच्या दोन खेप दिल्ली आणि पाटणा येथे कुरिअरद्वारे पाठवण्यात आल्याचेही निष्पन्न झाले आहे. त्यानंतर लॉजिस्टिक कंपनीच्या गोदामावर छापा टाकण्यात आला. यामध्ये १४ कोटींची १७२ सोन्याची बिस्किटे जप्त करण्यात आली आहेत.

नाशिक शिंदेंकडेच! हेमंत गोडसे यांना मिळाली उमेदवारी

अखेर ठरले! महायुतीने ठाण्यातून शिंदे गटाचे शिलेदार नरेश म्हस्के, कल्याणमधून श्रीकांत शिंदे यांना दिली उमेदवारी

पंतप्रधान मोदींनी पवारांवर केलेल्या 'त्या' टीकेला उद्धव ठाकरेंचे प्रत्युत्तर; "वखवखलेला आत्मा..."

LPG Price Cut : व्यावसायिक LPG गॅस सिलिंडरच्या किंमतीत कपात; आजपासून लागू होणार नवे दर

आज मुंबई, ठाणेसह कोकणात उष्णतेची लाट; मराठवाडा, विदर्भात पावसाचा इशारा