मुंबई

मुंबई विमानतळावर दहा कोटींचे सोने जप्त; तस्करीप्रकरणी सहाजणांना अटक

सोने तस्करीप्रकरणी सहाजणांच्या एका टोळीला छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर डीआरआयच्या अधिकाऱ्यांनी अटक केली.

Swapnil S

मुंबई : सोने तस्करीप्रकरणी सहाजणांच्या एका टोळीला छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर डीआरआयच्या अधिकाऱ्यांनी अटक केली. या कारवाईत या अधिकाऱ्यांनी सुमारे दहा कोटीचे साडेबारा किलो सोने जप्त केले आहे. अटकेनंतर या सर्वांना स्थानिक न्याायालयात हजर करण्यात आले.

विदेशातून सोने आणल्यानंतर काही तस्कर विमानतळावरील कर्मचाऱ्यांच्या मदतीने ते सोने विमानतळाबाहेर आणून देतात. विमानतळावर सोने तस्करी करणारी एक टोळीच कार्यरत असल्याची माहिती डीआरआयच्या अधिकाऱ्यांना मिळाली होती. या माहितीनंतर या अधिकाऱ्यांनी साध्या वेशात पाळत ठेवली होती. या कारवाईत पोलिसांनी विमानतळावरील फुड कोर्टमध्ये काम करणाऱ्या तीन कर्मचाऱ्यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे या अधिकाऱ्यांना काही सोने सापडले होते. हे सोने विमानतळाबाहेर असलेल्या काही रिसीव्हर्सना ते देणार होते. या टोळीने यापूर्वीही विदेशातून आणलेले सोने विमानतळाबाहेर काही रिसीव्हर्सना दिल्याचा संशय आहे. गेल्या दोन दिवसांत वेगवेगळ्या कारवाईत डीआरआयच्या अधिकाऱ्यांनी ३६ किलो सोने जप्त केले आहे.त्याची किंमत सुमारे २५ कोटीहून अधिक असल्याचे सांगण्यात आले.

चेंडूच्या आकाराचे सोन्याचे २४ गोळे जप्त

पोलीस पथकाने विमानतळाबाहेर असलेल्या तीन रिसीव्हर्सना चौकशीसाठी ताब्यात घेतले. त्यांच्याकडून या अधिकाऱ्यांनी आठ पाऊचमध्ये ठेवलेले चेंडूच्या आकाराचे २४ सोन्याचे गोळे जप्त केले. साडेबारा किलो वजनाच्या या सोन्याची किंमत सुमारे दहा कोटी रुपये इतकी आहे. तिन्ही कर्मचारी आंतरराष्ट्रीय विमानतळावर काम करत असून त्यांच्यावर सोने विमानतळावर आणून देण्याची जबाबदारी सोपविण्यात आली होती. त्यासाठी त्यांना ठराविक रक्कमेचे कमिशन मिळत होते.

Maratha Reservation : सलग तिसऱ्या दिवशी वाहतूक विस्कळीत; CSMT परिसरात आंदोलकांचे बस्तान

Maratha Reservation: आंदोलनाची धग वाढणार; मनोज जरांगे आजपासून पाणी पिणेही बंद करणार; एकतर विजययात्रा, नाहीतर अंत्ययात्रा

Maratha Reservation : दक्षिण मुंबईत आज पुन्हा कोंडीची शक्यता

Maratha Reservation : CSMT परिसरात अस्वच्छता; राज्यभरातून अन्नपदार्थांचा ओघ वाढल्याने नासाडी

Maratha reservation protest : सुप्रिया सुळेंना आंदोलकांचा घेराव; गाडीवर बाटल्या भिरकावल्या