PM
मुंबई

CRZ चे उल्लंघन करून गोराईत सीमाभिंतीची उभारणी; महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाकडून BMC आणि CRZ च्या नियमांना केराची टोपली

महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या वतीने गोराई येथे सीआरझेडच्या नियमांना केराची टोपली दाखवत सीमा भिंत बांधण्यात येत आहे, तर या सीमाभिंतीच्या बांधकामासाठी नियुक्त केलेल्या कंत्राटदारांची आठ महिन्यांपूर्वी कार्यदेशाची मुदत संपली आहे.

Swapnil S

मुंबई : महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या वतीने गोराई येथे सीआरझेडच्या नियमांना केराची टोपली दाखवत सीमा भिंत बांधण्यात येत आहे, तर या सीमाभिंतीच्या बांधकामासाठी नियुक्त केलेल्या कंत्राटदारांची आठ महिन्यांपूर्वी कार्यदेशाची मुदत संपली आहे. महाराष्ट्र पर्यंटन विकास महामंडळाने सीमाभिंत बांधण्यापूर्वी मुंबई महानगरपालिका आणि महाराष्ट्र किनारी क्षेत्र व्यवस्थापन विभागाची परवानगी घेणेही गरजेचे समजले नसल्याचे माहितीच्या अधिकारातून समोर आले आहे.

गोराई येथील किनारपट्टीचा भाग सीआरझेड-३ अंतर्गत येत असल्याने या ठिकाणी उच्च लाटांच्या किनारपट्टीच्या २०० मीटरच्या आत कपाऊंड भिंतीसह बांधकाम करण्यास मज्जाव आहे. तसेच, तसा शासन नियम आहे. तरीही महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने या ठिकाणी सीमाभिंत बांधण्याचा घाट घातला आहे. यासाठी मंडळाने मुंबई महानगरपालिकेच्या इमारत प्रस्ताव विभागाला आणि महाराष्ट्र किनारी क्षेत्र व्यवस्थापन विभागाला गृहीत धरले आहे. या दोन्ही विभागांची परवानगी घेतल्याशिवाय सीआरझेड भागात कोणतेही बांधकाम करता येत नाही. याचाही महामंडळाला विसर पडला आहे.

सीमाभिंतीच्या बांधकामाचे सीआरझेड २/३, बफर झोन, नो डेव्हलपमेंट झोन नियमांचे पालन करण्याचे अधिकृतपणे मूल्यांकन करण्यासह सीआरझेड नियमांचे पालन न केल्याचे आढळ्यास महाराष्ट्र पर्यंटन विकास महामंडळाला कारणे दाखवा नोटीस बजावण्याची विनंती नागरिकांनी केली आहे.

दरम्यान, एमटीडीसी सीआरझेडमधील भविष्यातील कोणत्याही संरचनेसाठी पूर्वमंजुरी आणि एनओसी घेते की नाही, याकडेही लक्ष देण्याची मागणी येथील नागरिकांनी केली आहे. तर, पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी संबधित विभागाने लवकरात लवकर या ठिकाणी उभारलेली सीमाभिंत काढून टाकण्याची मागणी येथील नागरिकांनी लावून धरली आहेत.

दारूवरील व्हॅट, परवाना शुल्कवाढीला विरोध; सोमवारी राज्यातील हॉटेल्स, रेस्टॉरंट्स बंद

नवी मुंबई विमानतळावरून सप्टेंबरअखेरीस टेक ऑफ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन

Ahmedabad Plane Crash: इंधन पुरवठा बंद, विमान कोसळले; एएआयबीचा प्राथमिक अहवाल सादर, वैमानिकांमधील अखेरचा संवाद उघड

शरद पवार गटाचे नवे कॅप्टन शशिकांत शिंदे ? मंगळवारी प्रदेशाध्यक्ष पदाची घोषणा, जयंत पाटील पायउतार होणार

आयफोन, आयवॉचने कळणार स्त्री गर्भवती आहे का? कृत्रिम बुद्धिमत्तेची मदत