मुंबई

"इच्छा दोघांची पण गुण जुळेनात..." अजित पवारांच्या बंडखोरीवरील चर्चेवर काय म्हणाले गुलाबराव पाटील?

गेले अनेक दिवस राष्ट्रवादीचे नेते अजित पवार हे पक्षात बंडखोरी करणार असल्याच्या चर्चेमध्ये शिवसेना शिंदे गटाचे गुलाबराव पाटील यांनी केले मिश्किल टीप्पणी

नवशक्ती Web Desk

गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार हे महाविकास आघडीत नाराज असून ते भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. यावर त्यांनी काल माध्यमांसमोर स्पष्टीकरण दिले. ते म्हणाले हे सर्व गैरसमज पसरवण्याचे काम सुरु असून पक्ष सोडणार नसल्याचे स्पष्ट केले. तरीही अजूनही काही नेते हे त्यांच्या भाजप प्रवेशाबाबत आणि राष्ट्रवादीशी बंडखोरीबाबत चर्चा करत आहे. या प्रश्नावरून मंत्री गुलाबराव पाटील यांनीदेखील प्रतिक्रिया देताना आपले मत मांडले.

मंत्री गुलाबराव पाटील म्हणाले की, "माझ्या मत अजून तिथी जवळ आलेली नसून गुणही जुळत नाही आहेत. त्यामुळे आता त्यासाठी कोणती पूजा करावी लागेल? हे एखाद्या ब्राम्हणाला विचारावे लागेल. पण काळजी करू नका, ती वेळ येईल." असे सूचक विधान त्यांनी केले. तसेच, ते पुढे म्हणाले की, "दोघांचीही इच्छा आहे, परंतु गुण जुळत नसल्याचे ब्राम्हणाने सांगितले आहे." अशी मिश्कील टीप्पणी त्यांनी केली. त्याच्या या विधानामुळे पुन्हा एकदा अजित पवार यांच्या भाजप पक्षप्रवेशाच्या चर्चांना उधाण आले आहे.

मविआचा महानिक्काल, महायुतीच लाडकी; महायुतीला २३६ जागा, तर मविआला केवळ ४९ जागा

‘लाडकी बहीण’ योजना ठरली गेमचेंजर; देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्रीपदाचे प्रमुख दावेदार

झारखंडमध्ये ‘जेएमएम’च्या नेतृत्वाखालील सरकार; इंडिया आघाडीकडे बहुमत, भाजप दुसऱ्या क्रमांकावर

‘सिंह’ म्हातारा झालाय!

ठाकरेंचे वलय संपले का?