मुंबई

नवाब मलिक यांच्या जमीन अर्जावर २९ जुलैला सुनावणी निश्चित

सुमारे ३०० कोटींच्या मालमत्तेचा व्यवहार करणाऱ्‍या कंपनीशी मलिक यांचा संबंध असल्याचे ईडीला तपासात आढळले

प्रतिनिधी

अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमशी संबंधित मनी लाँड्रिंगप्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाकडून (ईडी) अटक करण्यात आलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांच्या जमीन अर्जावर २९ जुलैला सुनावणी निश्चित केली आहे. दरम्यान ईडीने या अर्जाला जोरदार विरोध केला आहे.

ईडीने दाऊदचा भाऊ इक्बाल कासकरला ताब्यात घेऊन चौकशी केली. दाऊदच्या हस्तकाशी संबंधित असलेल्या सुमारे ३०० कोटींच्या मालमत्तेचा व्यवहार करणाऱ्‍या कंपनीशी मलिक यांचा संबंध असल्याचे ईडीला तपासात आढळले. त्यानुसार ईडीने कारवाई करत मलिक यांना २३ फेब्रुवारी रोजी अटक केली होती. आता मलिक यांनी नव्याने अर्ज दाखल केला असून जवळपास पाच महिने उलटूनही तपास यंत्रणेकडून सबळ पुरावे दाखल करण्यात आले नसल्याचा दावा मलिक यांनी याचिकेत केला आहे.

Video : 'ही अटक नाही तर अपहरण'; सुटकेनंतर ध्रुव राठीची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला - 'त्यांनी मला बेडरूममधून...

आजीच्या निधनानंतर अभिजीत दिपके गावी परतणार; 'CJP मागे हटणार नाही', पोस्टमधून स्पष्ट केली भूमिका

CJP Protest : 'सरकारने मोठी चूक केली'; अजिंक्य शिंदेंची आज मुंबईत आंदोलनाची हाक, पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त, Video

मोठी बातमी! कोर्टाकडून CJP ला दिलासा; यूट्यूबर ध्रुव राठीसह प्रमुख नेत्यांची सुटका, आज पुन्हा जंतर-मंतरवर मोर्चा

Mumbai : लोअर परळच्या देवीमूर्तीचा भव्य थाट; लालबागच्या राजाच्या सिंहासनाची खास झलक व्हायरल