मुंबई

मुसळधार पावसामुळे मध्य, पश्चिम रेल्वे विस्कळीत

मध्य आणि पश्चिम रेल्वे प्रशासनाचे पावसामुळे धाबे दणाणले आहेत.

प्रतिनिधी

मागील दोन दिवसांपासून राज्यातील विविध भागात पावसाने दमदार हजेरी लावली आहे. मुंबई शहरात देखील पावसाने जोरदार बॅटिंग करत जनजीवन विस्कळीत केले आहे. या पावसाचा सर्वाधिक फटका उपनगरीय रेल्वे मार्गावर धावणाऱ्या लोकलला बसत असून सोमवार ४ जुलै रोजी पावसामुळे मध्य, पश्चिम रेल्वेवरील वाहतूक तब्बल २० ते २५ मिनिटे उशिराने धावत आहे. तर अनेक लोकल रद्द करण्यात आल्या आहेत. यामुळे प्रवाशांना स्थानकात खोळंबून राहावे लागत आहे.

मध्य आणि पश्चिम रेल्वे प्रशासनाचे पावसामुळे धाबे दणाणले आहेत. मान्सूनपूर्व कामे पूर्ण केली असली तरी पावसाच्या माऱ्यापुढे अवघ्या काही दिवसातच विविध कारणांनी रेल्वे सेवा विस्कळीत होत असल्याचे दिसून येत आहे.

बुधवार रात्रीपासून सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे उपनगरीय रेल्वे मार्गावर बहुतांश ठिकाणी रुळांमध्ये पाणी साचणे, सिग्नल यंत्रणेत बिघाड यांसारख्या घटना घडल्या. परिणामी सोमवार ४ जुलै रोजी दुपारच्या सुमारास रेल्वे वाहतूक तब्बल २० मिनिटे उशिराने धावत असल्याचे निदर्शनास आले आहे. तर अनेक गाड्या रद्द करण्यात आल्या. परिणामी सीएसएमटी दिशने येणाऱ्या लोकल विलंबाने धावत होत्या. तर बहुतांश लोकलसेवा अचानक रद्द करण्यात आल्याने प्रवाशांना रेल्वे स्थानकात खोळंबून राहावे लागले. तर काही प्रवाशांनी पुन्हा माघारी परतणे पसंत केले.

"२६/११ नंतर पाकिस्तानला प्रत्युत्तर देणार होतो, पण...; पी. चिदंबरम यांचा गौप्यस्फोट

पावसाची विश्रांती; पूरस्थिती कायम! पूरग्रस्त शेतकऱ्यांना हवा मदतीचा आधार; अतिवृष्टी, गारपीट, टंचाईग्रस्तांना जिल्हा वार्षिक निधीतून मदत

झोपेतच सर्पदंश! ३ वर्षांच्या चिमुकलीसह मावशीचा मृत्यू; KDMC रुग्णालयावर निष्काळजीपणाचा आरोप

पृथ्वीराज चव्हाण, विखे-पाटील यांना कोर्टाचा दिलासा

चेंगराचेंगरी हा द्रमुकाचा कट; विजय थलापतींचा आरोप; उच्च न्यायालयात धाव