मुंबई उच्च न्यायालय संग्रहित छायाचित्र, पीटीआय
मुंबई

मालमत्तेसाठी भावंडांनी आपापसात लढणे खेदजनक; उच्च न्यायालयाने व्यक्त केली चिंता

'रक्षाबंधन' आणि 'भाऊबीज' या दोन सणांचे महत्त्व भाऊ-बहिणीच्या शाश्वत नात्याचे प्रतिबिंब आहे. मात्र आजकाल भावंडे एकमेकांच्या पाठीशी उभे न राहता पालकांच्या मालमत्तेवर दावा करण्यासाठी न्यायालयात एकमेकांविरुद्ध उभी राहतात हे अत्यंत खेदजनक आहे, अशी टिप्पणी उच्च न्यायालयाने एका प्रकरणात केली.

Swapnil S

मुंबई : 'रक्षाबंधन' आणि 'भाऊबीज' या दोन सणांचे महत्त्व भाऊ-बहिणीच्या शाश्वत नात्याचे प्रतिबिंब आहे. मात्र आजकाल भावंडे एकमेकांच्या पाठीशी उभे न राहता पालकांच्या मालमत्तेवर दावा करण्यासाठी न्यायालयात एकमेकांविरुद्ध उभी राहतात हे अत्यंत खेदजनक आहे, अशी टिप्पणी उच्च न्यायालयाने एका प्रकरणात केली. मालमत्तेवरून भावंडांमध्ये होणाऱ्या वादाच्या प्रकारांवर न्यायालयाने चिंता व्यक्त केली आहे.

भाऊबीज व रक्षाबंधन हे दोन्ही सण भावंडांमधील प्रेम, आधार, विश्वास आणि संरक्षणाचा एक हृद्य सोहळा आहे. चांगल्या-वाईट काळात जेव्हा जेव्हा कोणाला दुसऱ्याची गरज असेल, तेव्हा दोन्ही भावंडांनी एकमेकांच्या पाठीशी उभे राहावे. हा नैतिक आधाराचा एक बंध आहे, असेही निरीक्षण उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती जितेंद्र जैन यांनी नोंदवले. पलानीस्वामी ओबुली चेट्टी यांनी त्यांची बहीण रंगम्मा सौंदप्पा चेट्टी आणि इतरांविरुद्ध दाखल केलेल्या मानहानीच्या खटल्यात न्यायमूर्ती जितेंद्र जैन यांनी निकाल दिला.

ढासळते कौटुंबिक संबंध

रंगम्मा यांना खटल्याचे समन्स बजावण्यात आले नव्हते, असा युक्तिवाद त्यांच्या वकिलांनी केला होता. मात्र कनिष्ठ न्यायालयाने विलंब झाल्याचे कारण देत रंगम्मा यांचा लेखी जबाब स्वीकारण्यास नकार दिला होता. न्यायालयाच्या निर्णयावर न्यायमूर्ती जैन यांनी बोट ठेवले आणि विसंगती दाखवून दिल्या. विलंबामुळे प्रतिवादीचा लेखी जबाब स्वीकारण्यास नकार देणारा कनिष्ठ न्यायालयाचा आदेश रद्द केला. या निर्णयात भावंडांतील ढासळत्या कौटुंबिक संबंधांवरही प्रकाश टाकला.

Pune Rain : उकाड्याने हैराण पुणेकरांना पावसाचा दिलासा! शहरातील अनेक भागांत बरसल्या सरी

NEET UG 2026 Re-Exam : उशिरा पोहोचल्याने दोन विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रात प्रवेश नाकारला; गेट बंद होताच गोंधळ

BEST संपामुळे महामुंबई मेट्रोचा नवा विक्रम; एका दिवसात ३ लाख ५७ हजारांहून अधिक प्रवाशांचा प्रवास

Mumbai : 'एलटीटी'त ५६ तासांचा विशेष ट्रॅफिक ब्लॉक; अनेक एक्स्प्रेस गाड्यांवर होणार परिणाम

"माझ्या मृत्यूसाठी कोणीही जबाबदार नाही..."; हैदराबादमध्ये NEET पुनर्परीक्षेआधीच टोकाचं पाऊल, १९ वर्षीय विद्यार्थिनीने संपवलं जीवन