सरकारी जप्तीपेक्षा बँक आधी मालमत्ता विकू शकते; उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय संग्रहित छायाचित्र
मुंबई

Mumbai : सरकारी जप्तीपेक्षा बँक आधी मालमत्ता विकू शकते; उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय

जर एखाद्या कंपनीने बँकेचे कर्ज बुडवले, तर सरकारी जप्तीआधी बँकेला त्या कंपनीची मालमत्ता विकून आपले पैसे वसूल करण्याचा पहिला अधिकार आहे, असा निकाल उच्च न्यायालयाने दिला.

Swapnil S

मुंबई : जर एखाद्या कंपनीने बँकेचे कर्ज बुडवले, तर सरकारी जप्तीआधी बँकेला त्या कंपनीची मालमत्ता विकून आपले पैसे वसूल करण्याचा पहिला अधिकार आहे, असा निकाल उच्च न्यायालयाने दिला. मालमत्ता आधी बँकेकडे अधिकृतपणे गहाण ठेवली होती, त्यामुळे ती विकून पैसे वसूल करण्याचा पहिला हक्क बँकेचाच आहे, असे न्यायालयाने नमूद केले.

अपीलकर्त्या बँकेने २००९ ते २०१२ दरम्यान एका कंपनीला मोठे कर्ज दिले होते. त्या बदल्यात कंपनीने मालमत्ता बँकेकडे गहाण (तारण) ठेवली होती. कंपनीने बँकेचे पैसे परत केले नाहीत.

'तो' निर्णय रद्द

खंडपीठाने विशेष न्यायालयाचा 'तो' निर्णय रद्द केला आणि बँकेच्या बाजूने निकाल दिला. बँकेत असलेला पैसा हा सर्वसामान्य जनतेचा असतो. त्यामुळे खासगी व्यापाऱ्यांपेक्षा बँकेचा पैसा वाचवणे जास्त महत्त्वाचे आहे, असे न्यायालयाने स्पष्ट केले.

होर्मुझमध्ये पुन्हा नाकेबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा

दोन्ही राष्ट्रवादीत अस्वस्थता; सुनेत्रा पवार गटाला कुरबुरींचे, तर शरद पवार गटाला फुटीचे ग्रहण?

पदोन्नतीचा निर्णय रद्द करण्याच्या हालचाली; मागासवर्गीय कर्मचाऱ्यांमध्ये नाराजीची भावना

Mumbai : जुहू येथे १० वर्षीय मुलाचा बुडून मृत्यू

राम मंदिर देणगी तपासाचा अहवाल द्या; सर्वोच्च न्यायालयाचे एसआयटीला निर्देश