मुंबई उच्च न्यायालय (संग्रहित छायाचित्र) 
मुंबई

सोसायटी पुनर्विकासात विकासक निवडीसाठी निविदा अनिवार्य नाही; उच्च न्यायालयाचा महत्वपूर्ण निर्वाळा

सोसायटीच्या पुनर्विकासात विकासकाची निवड करण्यासाठी निविदा जारी करण्यासंबंधी सरकारी निर्णय (जीआर) अनिवार्य नाही. तो केवळ निर्देशात्मक स्वरूपाचा आहे, असा महत्त्वपूर्ण निर्वाळा उच्च न्यायालयाने दिला आहे.

Swapnil S

मुंबई : सोसायटीच्या पुनर्विकासात विकासकाची निवड करण्यासाठी निविदा जारी करण्यासंबंधी सरकारी निर्णय (जीआर) अनिवार्य नाही. तो केवळ निर्देशात्मक स्वरूपाचा आहे, असा महत्त्वपूर्ण निर्वाळा उच्च न्यायालयाने दिला आहे. राज्य सरकारने यासंदर्भात ४ जुलै २०१९ रोजी जीआर जारी केला होता. तो अनिवार्य नसल्याचे न्यायमूर्ती श्याम सुमन आणि न्यायमूर्ती मंजुषा देशपांडे यांच्या खंडपीठाने स्पष्ट केले.

मुंबई शहर व उपनगरांतील हजारो इमारतींच्या पुनर्विकासाची प्रक्रिया सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर उच्च न्यायालयाने जुलै २०१९ च्या जीआरसंबंधी महत्त्वपूर्ण टिप्पणी केली आहे. विकासकाची नियुक्ती करण्यासाठी केवळ निविदा जारी न केल्याने कायद्याच्या उद्देशाचे उल्लंघन झाले आहे, असे होत नाही, असे खंडपीठाने म्हटले आहे. न्यायालयाने या मुद्द्यावर विविध निकालांचा संदर्भ दिला आहे.

ठाकरे बंधूंची यंदा 'एकत्र' दिवाळी! मनसे दीपोत्सवाचे उद्घाटन उद्धव ठाकरेंच्या हस्ते

वडिलांपेक्षा मुलगा वयाने मोठा कसा? सर्वपक्षीय शिष्टमंडळाची निवडणूक आयोगासमोर प्रश्नांची सरबत्ती, राज ठाकरेंच्या प्रश्नांनी वेधले लक्ष

IPS पूरन कुमार प्रकरणाला नवे वळण; तपास करणाऱ्या IAS अधिकाऱ्याचीही आत्महत्या, सुसाइड नोटमध्ये गंभीर आरोप

कॉ. गोविंद पानसरे हत्या प्रकरण : मुख्य आरोपी वीरेंद्र तावडेसह दोघांना जामीन

पहिले वेअरेबल पेमेंट्स इकोसिस्टम लाँच; आयआयटी मद्रास-एनपीसीआयसोबत भागीदारी