मुंबई

पदपथावर राहणाऱ्यांना हटवण्याचे आदेश देण्यास हायकोर्टाचा नकार

मुंबई शहर आणि उपनगरांतील फूटपाथवर अनधिकृत विक्रेते तसेच फेरीवाल्यांनी कब्जा केल्याच्या मुद्द्यावर उच्च न्यायालयाने सुमोटो याचिका दाखल करून घेतली

प्रतिनिधी

दक्षिण मुंबईतील पदपथवार संसार थाटणाऱ्या कुटुबांना हटकवण्याचे आदेश द्या, अशी विनंती करणाऱ्या बार असोसिएशनची विनंती मुंबई हायकोर्टाने फेटाळून लावली. बेघर होणे ही वैश्विक समस्या आहे. फुटपाथवर आश्रय घेणारी बेघर कुटुंबेही माणसेच आहे. त्यांचा फुटपाथवरील संसार हटवण्याचा आदेश आम्ही देऊ शकत नाही, अशी संवेदनशील भूमिका घेत न्यायमूर्ती गौतम पटेल आणि न्यायमूर्ती डॉ. नीला गोखले यांच्या खंडपीठाने पदपथावरील कुटंबियांना हटविण्याचे आदेश पोलीस आणि पालिका प्रशासनाला देण्याची बॉम्बे बार असोसिएशनची विनंती फेटाळली.

मुंबई शहर आणि उपनगरांतील फूटपाथवर अनधिकृत विक्रेते तसेच फेरीवाल्यांनी कब्जा केल्याच्या मुद्द्यावर उच्च न्यायालयाने सुमोटो याचिका दाखल करून घेतली आहे. त्या याचिकेवर शुक्रवारी न्या. गौतम पटेल आणि न्या. डॉ. नीला गोखले यांच्या खंडपीठापुढे सुनावणी झाली. यावेळी बॉम्बे बार असोसिएशनने दक्षिण मुंबईच्या फाउंटन परिसराजवळील फूटपाथवर अनेक बेघर लोक राहत असल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आणून देताना, त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी मुंबई पोलीस आणि मुंबई महापालिका प्रशासनाला अनेकदा पत्र लिहिली. मात्र त्या पत्रांना अनुसरून प्रशासनाकडून कुठलीही कार्यवाही झाली नाही. त्यामुळे त्यांच्यावर कारवाईचे निर्देश पोलीस आणि पालिका प्रशासनाला द्या, अशी विनंती बार असोसिएशनच्यावतीने अ‍ॅड. मिलिंद साठे यांनी केली.

शिवरायांचे किल्ले ‘युनेस्को’च्या जागतिक वारसास्थळ यादीत

मोस्ट वॉन्टेड दहशतवाद्याचा कॅनडातील कपिल शर्माच्या कॅफेवर गोळीबार

सरकारची इलेक्ट्रिक ट्रक प्रोत्साहन योजना सुरू; PM e-Drive अंतर्गत ९.६ लाख रु.मिळणार

टेस्ला पुढील आठवड्यात भारतात प्रवेश करण्यास सज्ज; वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये पहिले शोरूम सुरू करणार

अजित पवारांची माफी मागा! लक्ष्मण हाके यांना राष्ट्रवादीची नोटीस