मुंबई

‘एचएमपीव्ही’चा मुंबईतही शिरकाव; सहा महिन्यांच्या बालकाला लागण

महाराष्ट्रासह देशात ‘एचएमपीव्ही’ व्हायरसचा शिरकाव झाला असून आता मुंबईतही सहा महिन्यांच्या एका बालकाला ‘एचएमपीव्ही’ची लागण झाल्याचे समोर आले आहे.

Swapnil S

मुंबई : महाराष्ट्रासह देशात ‘एचएमपीव्ही’ व्हायरसचा शिरकाव झाला असून आता मुंबईतही सहा महिन्यांच्या एका बालकाला ‘एचएमपीव्ही’ची लागण झाल्याचे समोर आले आहे. पवई येथील हिरानंदानी रुग्णालयात या मुलीवर उपचार सुरू होते. परंतु आता तिला डिस्चार्ज देण्यात आला असून मुलीची प्रकृती स्थिर असल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले. नागपूर, बंगळुरूनंतर मुंबईत ‘एचएमपीव्ही’ व्हायरसचा शिरकाव झाल्याने मुंबईकरांनी काळजी घ्यावी, असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.

दरम्यान, ‘एचएमपीव्ही’ व्हायरसच्या धोका लक्षात घेऊन बॉम्बे रुग्णालयासह खाजगी रुग्णालये सज्ज ठेवण्यात आली आहेत. औषध साठा, बेड्स, डॉक्टर, रुग्णालयीन स्टाफ अलर्ट मोडवर ठेवण्यात आले आहेत. दरम्यान, हा व्हायरस नवीन नसून लोकांनी घाबरु नये, असे आवाहन खाजगी रुग्णालयाचे समन्वयक डॉ. गौतम भन्साळी यांनी जनतेला केले आहे.

‘मेटान्युमो’ व्हायरसची लागण झालेल्या या मुलाला १ जानेवारीला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. या मुलाला खोकला आणि ऑक्सिजनची पातळी ८४ पर्यंत खाली होती. मात्र, या विषाणूवर कोणतेही विशिष्ट उपचार नसल्याने लक्षणांनुसार या मुलावर उपचार करण्यात आल्याचे रुग्णालय प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले. या रुग्णाबाबत स्थानिक प्रशासनाला १ जानेवारीला माहिती देण्यात आली. मात्र, पालिका प्रशासनाने याबाबत अद्याप कोणताही अहवाल प्राप्त झाला नसल्याचे स्पष्ट केले आहे.

एकत्र आणणं माननीय बाळासाहेबांना जमलं नाही, ते देवेंद्र फडणवीसांना जमलं; राज ठाकरेंचा हल्लाबोल

''कुठचाही 'झेंडा' नाही, मराठी हाच 'अजेंडा'; माझ्या मराठीकडे-महाराष्ट्राकडे वेड्यावाकड्या नजरेने पाहायचं नाही,'' वाचा राज ठाकरे यांचं संपूर्ण भाषण

''जर इथे येऊन धंदा करताय तर मराठी बोलायची लाज कसली?'' अभिनेते भरत जाधव यांचा संतप्त सवाल

गुजरातेत हिंदी सक्ती नसेल, तर ती महाराष्ट्रात कशासाठी? खासदार सुप्रिया सुळे यांचा संतप्त सवाल

‘जय गुजरात’मुळे वादंग; अमित शहांपुढे उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या घोषणेमुळे विरोधक संतप्त