तुमच्या Valentine ला द्या गोड सरप्राईज; घरच्या घरी बनवा टेस्टी गुलकंद शिरा

पारंपरिक शिऱ्याला जर थोडासा वेगळा ट्विस्ट द्यायचा असेल, तर गुलकंद शिरा हा उत्तम पर्याय ठरू शकतो. गुलाबाच्या पाकळ्यांपासून बनवलेला गुलकंद आणि रव्याचा सुगंधी शिरा यांचा संगम म्हणजे चव आणि सुवास यांची अप्रतिम मेजवानी.
तुमच्या Valentine ला द्या गोड सरप्राईज; घरच्या घरी बनवा टेस्टी गुलकंद शिरा
Published on

Valentine's Day Special : पारंपरिक शिऱ्याला जर थोडासा वेगळा ट्विस्ट द्यायचा असेल, तर गुलकंद शिरा हा उत्तम पर्याय ठरू शकतो. गुलाबाच्या पाकळ्यांपासून बनवलेला गुलकंद आणि रव्याचा सुगंधी शिरा यांचा संगम म्हणजे चव आणि सुवास यांची अप्रतिम मेजवानी. सण, वाढदिवस किंवा खास पाहुण्यांसाठी काहीतरी वेगळं बनवायचं असेल, तर हा शिरा वेस्ट ऑप्शन आहे. तर यंदाच्या 'व्हॅलेंटाईन डे' ला तुमच्या प्रिय व्यक्तीसाठी ही रेसिपी नक्की करून पाहा.

तुमच्या Valentine ला द्या गोड सरप्राईज; घरच्या घरी बनवा टेस्टी गुलकंद शिरा
Valentine’s Week : फक्त प्रेम नाही तर आरोग्यही! Kiss केल्याने होतात महत्त्वाचे फायदे, जाणून घ्या हेल्थ सीक्रेट

साहित्य (३–४ जणांसाठी) :

  • रवा - १ कप

  • साजूक तूप - अर्धा कप

  • साखर - पाऊण कप (चवीनुसार कमी-जास्त)

  • दूध - १ कप

  • पाणी - १ कप

  • गुलकंद - ३ ते ४ टेबलस्पून

  • वेलची पूड - अर्धा टीस्पून

  • काजू-बदाम - ८ ते १० (चिरलेले)

  • मनुका - ८ ते १०

  • गुलाब पाकळ्या (सजावटीसाठी) - ऐच्छिक

तुमच्या Valentine ला द्या गोड सरप्राईज; घरच्या घरी बनवा टेस्टी गुलकंद शिरा
Valentine’s Day Special : रेड ड्रेसमध्ये दिसा क्लासी आणि ट्रेंडी! परफेक्ट लूकसाठी पाहा Photo's

कृती :

कढईत तूप गरम करून त्यात रवा मंद आचेवर सोनेरी रंग येईपर्यंत भाजून घ्या. वेगळ्या भांड्यात पाणी आणि दूध गरम करून घ्या. भाजलेल्या रव्यामध्ये हळूहळू गरम दूध-पाण्याचे मिश्रण घाला आणि सतत हलवत राहा, जेणेकरून गाठी पडणार नाहीत. मिश्रण घट्ट होत आले की त्यात साखर घाला आणि पुन्हा हलवा. आता त्यात गुलकंद आणि वेलची पूड घालून नीट मिसळा. शेवटी तुपात परतलेले काजू, बदाम आणि मनुका घाला. झाकण ठेवून २ ते ३ मिनिटे वाफ येऊ द्या. गरमागरम, सुगंधी गुलकंद शिरा सर्व्ह करण्यासाठी तयार!

तुमच्या Valentine ला द्या गोड सरप्राईज; घरच्या घरी बनवा टेस्टी गुलकंद शिरा
Valentine’s Day Special : घरच्या घरी सोप्या पद्धतीने बनवा टेस्टी केक; नोट करा स्पेशल रेसिपी

टिप्स :

  • चवीसाठी दुधाऐवजी कंडेन्स्ड मिल्कचा वापर करू शकता.

  • गुलकंद गोड असतो, त्यामुळे साखर घालताना चव पाहून प्रमाण ठरवा.

  • गुलाब एसेंसचे १ ते २ थेंब घातल्यास सुगंध अधिक वाढतो.

  • उपवासासाठी बनवताना रव्याऐवजी साबुदाण्याचा वापर करून वेगळी चव तयार करू शकता.

logo
marathi.freepressjournal.in