मुंबई

HSC Exam : पेपरफुटीप्रकरणी ५ जणांचा अटक; पोलिसांची मोठी कारवाई

प्रतिनिधी

बारावीचा (HSC Exam) गणिताचा पेपर सोशल मीडियावर परीक्षेच्या अर्धातास आधी व्हायरल झाल्याची घटना काही दिवसांपूर्वी घडली होती. याप्रकरणी पोलिसांनी मोठी कारवाई केली असून तब्बल ५ जणांना पोलिसांनी अटक केली आहे. साखरखेर्डा पोलिसांनी अटक केलेल्या या ५ जणांमध्ये २ शिक्षकांचा समावेश आहे. याप्रकरणी अर्थसंकल्प अधिवेशनामध्येही विरोधकांनी शिंदे-फडणवीस सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला होता.

मिळालेल्या माहितीनुसार, साखरखेर्डा पोलिसांनी ५ जणांना अटक केली आहे. यामध्ये २ शिक्षकांसह ३ तरुणांना ताब्यात घेण्यात आले आहे. त्यांच्यावर कलम ४२० आणि १२० ब अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. मात्र, यामध्ये मुख्य सूत्रधार कोण आहे? याचा तपास सध्या पोलीस करत आहेत. या पेपरफुटी प्रकरणाचा मुद्दा अर्थसंकल्पीय अधिवेशनातसुद्धा गाजला होता. यावेळी विरोधकांकडून कडक कारवाई कर्णयःची मागणी करण्यात आली होती. गणिताचा हा पेपर सोशल मीडियावर व्हायरल होताच गटशिक्षणाधिकारी रंगनाथ गावडे यांनी पेपरफुटी प्रकरणी सिंदखेडराजा पोलिसांकडे तक्रार दाखल केली होती. यानंतर बुलढाण्यातील ४ परीक्षा केंद्रांचे संचालकांची तडकाफडकी बदली करण्यात आली.

महाराष्ट्रातील राजकारण भरकटत आहे!

नद्या आ वासताहेत...

काँग्रेसला मोठा धक्का! अरविंदर सिंग लवली यांचा दिल्लीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा; 'आप'सोबत युती केल्यामुळे नाराज

सरसंघचालक मोहन भागवत यांचे आरक्षणाच्या मुद्यावरून स्पष्टीकरण; "जोपर्यंत आरक्षणाची गरज..."

उज्ज्वल निकम यांना जळगावातून उमेदवारी द्यायला हवी होती - संजय राऊत