मुंबई

वांद्र्यातील आगीत शेकडो वाहने जळून खाक

दुर्घटनेत कोणीही जखमी झाले नसल्याची माहिती पालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन नियंत्रण कक्षाकडून देण्यात आली.

Swapnil S

मुंबई : वांद्रे पूर्व टीचर कॉलनीच्या मागे, सिद्धार्थ नगर येथे पार्किंगमध्ये मंगळवारी सायंकाळी ६.३० वाजताच्या सुमारास आग लागली. या दुर्घटनेत भंगारातील १०० ते १५० वाहने जळून खाक झाली. दरम्यान, अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेत रात्री उशिरा आगीवर नियंत्रण मिळवले.‌ या दुर्घटनेत कोणीही जखमी झाले नसल्याची माहिती पालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन नियंत्रण कक्षाकडून देण्यात आली.

वांद्रे पूर्व टीचर कॉलनीच्या मागे सिद्धार्थ नगर, सर्व्हिस रोड, स्मशानभूमीजवळ एक हजार चौरस फूट जागेत असलेल्या पार्किंग क्षेत्रात मंगळवारी सायंकाळी ६.३० वाजता भीषण आग लागली.

शिवसेना नाव, धनुष्यबाण चिन्ह कोणाचे ? १४ जुलैला सुनावणी

माऊलींच्या पालखीत 'माऊली'चा अपमान; चोपदाराने वारकरी महिलेला दिलं ढकलून| Video

बाजीराव पेशव्यांच्या पुतळ्याच्या अनावरण कार्यक्रमावर मस्तानी यांच्या वंशजाचा बहिष्कार

कोकणातील कातळशिल्पांचे जतन करा; मुंबई उच्च न्यायालयाचे राज्य सरकारला आदेश

दीपिका पदुकोण 'हॉलिवूड वॉक ऑफ फेम'वर झळकणार; इतिहास रचणारी ठरली पहिली भारतीय अभिनेत्री