संग्रहित छायाचित्र  
मुंबई

दाऊदशी आपले नाव जोडणाऱ्यांना कोर्टात खेचणार; नवाब मलिक यांचा महायुतीच्या नेत्यांना इशारा

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी, मलिक यांचा प्रचार करणार नसल्याचे स्पष्ट केले आणि दाऊदबद्दलचे आमचे मत आणि त्याच्याशी सर्व संबंधितांबाबतची आमची भूमिका स्पष्ट असल्याचे सांगितले होते.

Swapnil S

मुंबई : माझ्यासाठी प्रचार करू नका, आपण तसा आग्रहही करणार नाही. मात्र कुख्यात डॉन दाऊद इब्राहीम याच्याशी आपले नाव जोडणाऱ्यांना कोर्टात खेचणार असल्याचा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे मानखुर्द-शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघातील उमेदवार नवाब मलिक यांनी गुरुवारी महायुतीच्या नेत्यांना दिला.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी, मलिक यांचा प्रचार करणार नसल्याचे स्पष्ट केले आणि दाऊदबद्दलचे आमचे मत आणि त्याच्याशी सर्व संबंधितांबाबतची आमची भूमिका स्पष्ट असल्याचे सांगितले होते.

माझ्या प्रचारासाठी येण्याचा आग्रह नाही

माझ्या प्रचारासाठी येण्याची त्यांची इच्छा नसल्यास त्याला आपली हरकत नाही, प्रचाराला यावे असा आग्रह आपण धरणार नाही, मात्र आपले नाव दाऊद याच्याशी जोडणाऱ्यांविरुद्ध आपण कायदेशीर कारवाई करणार आहोत. आपल्यावर होत असलेले आरोप पूर्णपणे निराधार आहेत, आरोप करणारा नेता कितीही मोठा असला तरी त्याच्याविरुद्ध आपण कायदेशीर कारवाई करणार, असे मलिक यांनी स्पष्ट केले.

गणपती गेले गावाला...! 'पुढच्या वर्षी लवकर या'चा घुमला जयघोष; दहा दिवसांच्या गणेश मूर्तीचे उत्साहात विसर्जन

Mumbai : लालबागचा राजाच्या विसर्जनाला विलंब? तराफ्यावर मूर्ती चढवताना अडचणी

Maharashtra : बाप्पाच्या निरोपावेळी दुर्दैवी घटना; राज्यात ७ जणांचा मृत्यू

मुंबईत बॉम्बस्फोट घडवण्याची धमकी देणारा गजाआड; गोंधळ माजवण्यासाठी पाठवला संदेश

चौकशीची मागणी माझी वैयक्तिक! अंजना कृष्णा धमकीप्रकरणी मिटकरी यांचे घूमजाव