मुंबई

बेकायदा पोस्टर्स, बॅनर्स पालिकेच्या रडारवर; कारवाईसाठी ४ मार्चपर्यंत विशेष मोहीम, न्यायालयाने कान टोचल्यानंतर पालिका ॲक्शनमध्ये

Swapnil S

मुंबई : मुंबईच्या विद्रुपीकरणास कारणीभूत बेकायदा पोस्टर्स, बॅनर्स, होर्डिंग्ज यावर नाराजी व्यक्त करत राजकीय पक्षांना नोटीस बजावा, असे उच्च न्यायालयाने दिले आहेत. न्यायालयाच्या कानउघाडणीनंतर पालिका ॲक्शन मोडमध्ये आली असून बेकायदा पोस्टर्स बॅनरबाजी करणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी ४ मार्चपर्यंत विशेष मोहीम हाती घेतली आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार ३ डिसेंबर २०२३पासून स्वच्छ व सुंदर मुंबईसाठी सखोल स्वच्छता अभियान राबवण्यात येत आहेत. वॉर्ड स्तरावर अभियान राबवण्यात येत असून, अभियानात रस्ते धुलाई करण्यासह कचरामुक्त मुंबई, लटकणाऱ्या केबल हटवणे, बेवारस वाहने हटवणे, बेकायदा पोस्टर्स बॅनर्स होर्डिंग्ज हटवणे ही मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेंतर्गत जानेवारी २०२३ ते २० फेब्रुवारी २०२४ पर्यंत राजकीय, व्यावसायिक व धार्मिक असे एकूण ६२ हजार ६३७ पोस्टर्स बॅनर्स, होर्डिंग्ज हटवण्यात आल्याचे पालिकेच्या अनुज्ञापन विभागाकडून सांगण्यात आले; राजकीय पक्षांचे बेकायदा पोस्टर्स, बॅनर्स, होर्डिंग्ज लावले जात असून उच्च न्यायालयाने नाराजी व्यक्त करत याचिकर्त्याच्या याचिकेवर सुनावणी देत राजकीय पक्षांना नोटीस बजावण्याचे आदेश दिले. उच्च न्यायालयाने कान उघडणी केल्यानंतर पालिकेने गुरुवार २२ फेब्रुवारी ते ४ मार्चपर्यंत विशेष मोहीम राबवण्यात येत असल्याचे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले.

Lok Sabha Elections 2024: महाराष्ट्रात सकाळी ११ वाजेपर्यंत किती टक्के मतदान? जाणून घ्या सविस्तर आकडेवारी

मुंबई कुणाची? राज्यातील १३ मतदारसंघांत मतदान; महायुती आणि महाविकास आघाडीत जोरदार चुरस

'हे' बॉलिवूडकर भारतात करू शकत नाहीत मतदान!

Akshay Kumar Voting: या वर्षी अक्षय कुमारने प्रथमच मतदान केले, म्हणाला, "माझा देश विकसित झाला पाहिजे"

राहुल आणि अखिलेश यांच्या सभेत गोंधळ; भाषण न करताच निघून जाण्याची पाळी