मुंबई

व्यावसायिक गॅस सिलिंडरची अवैध विक्री करणाऱ्यांना अटक

प्रतिनिधी

व्यावसायिक गॅस सिलिंडरची अवैध विक्री केल्याप्रकरणी तिघांना चारकोप पोलिसांच्या एका विशेष पथकाने अटक केली. मांगीलाल रामकिशन बिष्णोई, श्रवणकुमार गंगाराम बिष्णोई आणि त्रिमूर्ती पेरुमल अशी या तिघांची नावे असून ते तिघेही कांदिवलीतील चारकोपर परिसरातील रहिवासी आहेत. या तिघांकडून पोलिसांनी सुमारे १० लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. अटकेनंतर तिन्ही आरोपींना बोरिवलीतील लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे.

कांदिवलीतील चारकोप, इफका कंपनीजवळ काही जण घरगुती गॅस सिलिंडरमधून गॅस काढून ते व्यावसायिक गॅस सिलिंडरमध्ये भरून या गॅस सिलिंडरची विक्री करीत असल्याची माहिती चारकोप एटीएसच्या अधिकाऱ्यांना मिळाली होती. या माहितीची शहानिशा करण्यासाठी छापा टाकला असता व्यावसायिक वापराच्या सिलिंडरमध्ये गॅस भरण्याचे काम सुरू असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. हा प्रकार लक्षात येताच तिथे उपस्थित असलेल्या मांगीलाल बिष्णोई, श्रवणकुमार बिष्णोई आणि त्रिमूर्ती पेरुमल या तिघांनाही पोलिसांनी अटक केली. या कारवाईत पोलिसांनी १९४ गॅस सिलिंडर, गॅस खेचणारी मोटार, एक टेम्पो असा सुमारे १० लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

पाचव्या टप्प्यातील प्रचार संपला; अखेरच्या क्षणी मतदार भेटीसाठी सर्वपक्षीय लगबग

आम्ही भाजप मुख्यालयात येतो, अटक कराच! अरविंद केजरीवाल यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना थेट आ‌व्हान

मोदींच्या बुलडोझरच्या वक्तव्याला इंडिया आघाडीचा आक्षेप; निवडणूक आयोगाने मोदींवर कारवाई करावी - खर्गे

क्रॉफर्ड मार्केटने टाकली कात, लवकरच मुंबईकरांच्या सेवेत

'त्या' कंपनीचे अजून ८ बेकायदा होर्डिंग्ज, BMC ची रेल्वेला नोटीस; पालिकेने होर्डिंग हटवल्यास खर्च रेल्वेकडून वसूल करणार