twitter
मुंबई

समीर वानखेडेंना अटकेपासून तुर्तास दिलासा

सीबीआयच्या वतीने सॉलिसिटर जनरल तुषार मेहता बाजू मांडणार

प्रतिनिधी

मुंबई : कॉर्डेलिया क्रुझ ड्रग्ज पार्टी प्रकरणात अभिनेता शाहरुख खानकडून २५ कोटींची खंडणी मागितल्या प्रकरणात सीबीआयने दाखल केलेला एफआयआर दाखल केल्याने वादाच्या भोवऱ्यात अडकलेल्या समीर वानखेडे यांना उच्च न्यायालयाने यापूर्वी दिलेला दिलासा कायम ठेवला. याप्रकरणी सीबीआयच्या वतीने सॉलिसिटर जनरल तुषार मेहता बाजू मांडणार असल्याने न्यायमूर्ती पी. डी. नाईक आणि न्यायमूर्ती एन आर बोरकर उच्च न्यायालय यांच्या खंडपीठाने सुनावणी १० जानेवारी रोजी निश्‍चित केली. तोपर्यंत वानखेडे यांच्याविरोधात कठोर कारवाई करू नका, असेही स्पष्ट केले.

कॉर्डेलिया क्रूझ ड्रग्ज पार्टी प्रकरणात आर्यन खानला सोडून देण्यासाठी समीर वानखेडे यांनी बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानकडून २५ कोटी रुपयांची मागणी केल्याचा आरोप आहे. याप्रकरणी सीबीआयने दाखल केलेला एफआयआर रद्द करण्यात यावा, अशी विनंती करीत वानखेडे यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.

या याचिकेवर न्यायमूर्ती पी.डी. नाईक आणि न्यायमूर्ती एन.आर. बोरकर यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. यावेळी सीबीआयच्या वतीने अ‍ॅड. कुलदीप पाटील यांनी या प्रकरणी सॉलिसिटर जनरल तुषार मेहता बाजू मांडणार असल्याने वेळ देण्याची विनंती केली. याची दखल घेत खंडपीठाने याचिकेची सुनावणी १० जानेवारीला निश्‍चित केली. तोपर्यंत वानखेडे यांना अटक अथवा अन्य कारवाईपासून यापूर्वी दिलेले संरक्षण कायम ठेवले.

आजपासून भारत आणि EFTA व्यापार करार अंमलात; पुढील १५ वर्षांत १०० अब्ज डॉलरची गुंतवणूक होणार

नवी मुंबई विमानतळाला अखेर ‘एअरोड्रोम परवाना’; ८ ऑक्टोबरला पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्‌घाटन

रिलायन्स इन्फ्रावर ‘ईडी’चे छापे; फेमा कायद्याचे उल्लंघन केल्याचा आरोप

गोकुळकडून दूध उत्पादकांना दिवाळी भेट; १३६ कोटींचा ‘दरफरक’ जमा होणार

NPS आता अधिक आकर्षक; आजपासून १०० टक्के समभागात गुंतवणुकीची परवानगी