मुंबई : प्रवाशांची मागणी लक्षात घेऊन मध्य रेल्वेने मुंबई ते रीवा आणि पुणे आणि जबलपूरदरम्यान धावणाऱ्या विशेष गाड्यांचा कालावधीत वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार मुंबई-रीवा आणि पुणे-जबलपूर विशेष गाड्यांच्या ५२ फेऱ्या वाढणार आहेत. यामुळे लांब प्रवाशांना दिलासा मिळणार आहे.
विशेष गाड्यांचा कालावधीत वाढ करण्यात आलेल्यांमध्ये छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई-रीवा विशेष १३ फेऱ्यांसाठी २७ सप्टेंबर पर्यंत वाढविण्यात आली आहे. तर ०२१८७ रीवा - छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई ही आता १३ फेऱ्यांसाठी २६ सप्टेंबर पर्यंत वाढविण्यात येत आहे. त्याचप्रमाणे पुणे-जबलपुर विशेष ०२१३१ पुणे-जबलपुर विशेष दर सोमवारी १ जुलै पर्यंत अधिसूचित असलेली गाडी आता १३ फेऱ्यांसाठी ३० सप्टेंबरपर्यंत वाढविण्यात येत आहे. ०२१३२ जबलपुर-पुणे विशेष दर रविवारची ३० जून पर्यंत अधिसूचित असलेली गाडी आता १३ फेऱ्यांसाठी २९ सप्टेंबर पर्यंत वाढविण्यात येत आहे.
या गाड्या सुटण्याचा दिवस, वेळ, संरचना आणि थांबा यामध्ये कोणताही बदल होणार नाही. तसेच विशेष शुल्कावर विशेष ट्रेन क्रमांक ०२१८८ आणि ०२१३१ च्या विस्तारित फेऱ्यांसाठीचे आरक्षण सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर आणि http://www.irctc.co.in या संकेतस्थळावर सुरू झाले आहे.
या विशेष ट्रेनच्या थांब्यांच्या तपशीलवार वेळेसाठी कृपया http://www.enquiry. indianrail.gov.in ला भेट द्या किंवा एनटीईएस ॲप डाउनलोड करावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.