मुंबई

आरबीआयने रेपो दरात वाढ केल्यामुळे कर्जदरात वाढ

सार्वजनिक क्षेत्रातील कॅनरा बँकेने रेपो लिंक्ड लेंडिंग रेट ५० बेसिस पॉइंट्सने वाढवून ८.३० टक्के केला आहे

वृत्तसंस्था

आरबीआयने रेपो दरात वाढ केल्यानंतर त्याचे परिणाम म्हणून बँकांकडूनही व्याजदरात वाढ केली जात आहे. आरबीआयने शुक्रवारी रेपो दर ४.९ टक्क्यांवरून ५.४ टक्क्यांवर वाढवल्यानंतर दुसऱ्याच दिवशी देशातील आघाडीची खासगी क्षेत्रातील बँक आयसीआयसीआय बँकेने कर्जावरील व्याजदरात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. आयसीआयसीआय बँकेशिवाय पंजाब नॅशनल बँक आणि कॅनरा बँकेनेही कर्जदरात वाढ करण्याची घोषणा केली आहे.

सार्वजनिक क्षेत्रातील कॅनरा बँकेने रेपो लिंक्ड लेंडिंग रेट ५० बेसिस पॉइंट्सने वाढवून ८.३० टक्के केला आहे. नवे दर आज, रविवार, ७ ऑगस्टपासून लागू झाले आहेत.

रेपो लिंक्ड लेंडिंग रेट वाढल्याने, कॅनरा बँकेकडून होम लोन, कार लोन, पर्सनल लोन अशा सर्व प्रकारची कर्जे घेणे पूर्वीपेक्षा महाग झाले आहे. याशिवाय ज्या ग्राहकांनी आधीच कर्ज घेतले आहे, त्या ग्राहकांना आता जास्त ईएमआय भरावा लागणार आहे.

कॅनरा बँकेच्या वेबसाइटवर अपडेट केलेल्या आकडेवारीनुसार, सामान्य ग्राहकांसाठी गृहकर्जावरील व्याजदर 8.10 टक्क्यांपर्यंत वाढवला जाईल. मात्र महिला ग्राहकांसाठी ते 8.05 टक्के केले जाईल. कॅनरा बँक महिला कर्जदारांना 0.05 टक्के सूट देते.

आयसीआयसीआय बँकेने एक सूचना जारी केली आहे की. बँकेने आपला बाह्य बेंचमार्क कर्ज दर (IEBLR) वाढविला आहे आणि तो रेपो दरानुसार केला आहे. बँकेने म्हटले आहे की IBLR ९.१० टक्क्यांपर्यंत वाढवला आहे. नवे दर ५ ऑगस्टपासून लागू झाले आहेत.

याशिवाय, सार्वजनिक क्षेत्रातील बँक पंजाब नॅशनल बँकेनेही रेपो दरात वाढ केल्यानंतर व्याजदरात वाढ करण्याची घोषणा केली आहे. पंजाब नॅशनल बँकेने एक्सटर्नल बेंचमार्क, रेपो लिंक्ड लेंडिंग रेट ७.९ टक्क्यांपर्यंत वाढवला आहे. पीएनबीने त्यांच्या नियामक फाइलिंग दरम्यान माहिती दिली आहे की, त्यांनी रेपो लिंक्ड लेंडिंग रेट .५० टक्क्यानी वाढवून ७.९० टक्के केला आहे. नवीन दर सोमवार, ८ ऑगस्टपासून लागू होणार असल्याची माहिती पीएनबीने दिली आहे.

राज्याच्या EV धोरणाला अपवाद! बॉम्बे उच्च न्यायालयातील ६३ न्यायमूर्तींसाठी नवीन पेट्रोल-डिझेल गाड्यांना परवानगी

गणेशोत्सवासाठी एसटीच्या ५ हजार जादा बसेस; कोकणात जाणाऱ्या प्रवाशांना दिलासा

कबुतरखाने तोडण्यास तात्पुरती मनाई; मुंबई उच्च न्यायालयाचे निर्देश

शाडू मातीच्या मूर्ती आता होणार ‘ऑनलाइन’ उपलब्ध; पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी BMC चे विशेष प्रयत्न

गेटवे ऑफ इंडियाजवळ प्रवासी जेट्टीला परवानगी; परिसरात सुविधा पुरवताना खबरदारी घेण्याचे हायकोर्टाचे सरकारला निर्देश