मुंबई

टी-२० क्रिकेटसाठी भारताकडे शमीपेक्षा वेगवान गोलंदाजांचे पर्याय उपलब्ध-पॉन्टिंग

वृत्तसंस्था

मोहम्मद शमी उत्कृष्ट गोलंदाज असून त्याच्या गुणवत्तेबाबत प्रश्न उपस्थित केले जाऊ शकत नाहीत. मात्र, त्याची शैली ही कसोटी क्रिकेटला साजेशी असून टी-२० क्रिकेटसाठी भारताकडे वेगवान गोलंदाजांचे त्याच्यापेक्षा दर्जेदार पर्याय उपलब्ध आहेत, असे मत ऑस्ट्रेलियाचे माजी कर्णधार रिकी पॉन्टिंग यांनी व्यक्त केले.

पॉन्टिंग म्हणाले की, ‘‘शमीने अनेक वर्षे भारताकडून सातत्यपूर्ण कामगिरी केली आहे; परंतु तो कसोटीमध्ये सर्वोत्तम गोलंदाजी करतो. टी-२० क्रिकेटसाठी भारताकडे वेगवान गोलंदाजांचे शमीपेक्षा दर्जेदार पर्याय उपलब्ध आहेत. आशिया चषकासाठी भारताने तीन वेगवान गोलंदाजांची निवड केली आहे. या स्पर्धेपूर्वी भारताने चौथ्या वेगवान गोलंदाजाला संघात स्थान देण्याचे ठरवल्यास शमीला संधी मिळू शकेल,’’

आशिया चषक स्पर्धेसाठी भारताने भुवनेश्वर कुमार, अर्शदीप सिंग आणि आवेश खान या वेगवान गोलंदाजांची निवड केली आहे. शमीला ऑस्ट्रेलियात होणाऱ्या टी-२० विश्वचषकासाठीही भारतीय संघात स्थान मिळेल, याची खात्री नसल्याचे मतही पॉन्टिंग यांनी व्यक्त केले.

पॉन्टिंग म्हणाले की, ‘‘आशिया चषकच नाही, तर कोणत्याही स्पर्धेत भारतीय संघ जेतेपदासाठी प्रबळ दावेदार असतो,’’

Lok Sabha Elections 2024: महाराष्ट्रात दुपारी १ वाजेपर्यंत किती टक्के मतदान ? बघा संपूर्ण आकडेवारी

मराठी "not welcome" म्हणणार्‍या लोकांना कृपया मत देऊ नका; रेणुका शहाणेंची पोस्ट चर्चेत

मतदान केल्यानंतर सुप्रिया सुळे अचानक अजित पवारांच्या घरी; म्हणाल्या...

Lok Sabha Elections 2024:पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अहमदाबादमध्ये केले मतदान; तिसऱ्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात!

ईशा अंबानी, नताशा पुनावाला ते आलिया भट्ट ; 'मेट गाला २०२४' ला 'या' भारतीयांनी लावली हजेरी!