मुंबई

भारतीय शेअर बाजारातील तेजी सहाव्या दिवशी रोखली ; सेन्सेक्समध्ये ३०६ अंकांनी झाली घट

शेअर बीएसई सेन्सेक्स ३०६.०१ अंक किंवा ०.५५ टक्के घसरुन ५५,७६६.२२ वर बंद झाला.

वृत्तसंस्था

सहाव्या दिवशी सोमवारी भारतीय शेअर बाजारातील तेजी रोखली गेली. तसेच विदेशी गुंतवणूक संस्थांनी पुन्हा विक्रीचा मारा केल्याने आणि रिलायन्स इंडस्ट्रीजसह अनेक कंपन्यांच्या समभागात घसरण झाल्याचा बाजारावर परिणाम झाला. सेन्सेक्समध्ये ३०६ अंकांनी घट झाली.

दि ३०-शेअर बीएसई सेन्सेक्स ३०६.०१ अंक किंवा ०.५५ टक्के घसरुन ५५,७६६.२२ वर बंद झाला. दिवसभरात तो ५३५.१५ अंक किंवा ०.९५ ५५,५३७.०८ ची किमान पातळी गाठली होती. अशाच प्रकारे राष्ट्रीय शेअर बाजारात निफ्टी ८८.४५ अंक किंवा ०.५३ टक्के घसरुन १६,६३१.०० वर बंद झाला.

सेन्सेक्सवर्गवारीत महिंद्रा ॲण्ड महिंद्राचा समभाग सर्वाधिक ३.८० टक्के घसरला. त्यापाठोपाठ रिलायन्स इंडस्ट्रीज ३.३१ टक्के घसरला कारण कंपनीने जूनला संपलेल्या तिमाहीचा जाहीर केलेला निकाल गुंतवणूकदारांमध्ये उत्साह निर्माण करु शकला नाही. घसरणलेल्या झालेल्या अन्य कंपन्यांमध्ये मारुती सुझुकी इंडिया, कोटक महिंद्रा बँक, अल्ट्राटेक सिमेंट, टेक महिंद्रा आणि नेस्ले यांचा समावेश आहे. याशिवाय, टाटा स्टील, इंडस‌्इंड बँक, एशियन पेंटस‌्, एचसीएल टेक्नॉलॉजीज, विप्रो आणि एनटीपीसी यांच्या समभागात वाढ झाली.

आशियाई बाजारात टोकियो, शांघायमध्ये घसरण तर सेऊलमध्ये वाढ झाली. दरम्यान, आंतरराष्ट्रीय तेल बाजारात ब्रेंट क्रूड १.२४ टक्के वधारुन प्रति बॅरलचा भाव १०४.५२ अमेरिकन डॉलर्स झाला. तसेच विदेशी गुंतवणूक संस्थांनी शुक्रवारी ६७५.४५ कोटींच्या समभागांची विक्री केली, अशी माहिती शेअर बाजाराने दिली.

दारूवरील व्हॅट, परवाना शुल्कवाढीला विरोध; सोमवारी राज्यातील हॉटेल्स, रेस्टॉरंट्स बंद

नवी मुंबई विमानतळावरून सप्टेंबरअखेरीस टेक ऑफ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन

Ahmedabad Plane Crash: इंधन पुरवठा बंद, विमान कोसळले; एएआयबीचा प्राथमिक अहवाल सादर, वैमानिकांमधील अखेरचा संवाद उघड

शरद पवार गटाचे नवे कॅप्टन शशिकांत शिंदे ? मंगळवारी प्रदेशाध्यक्ष पदाची घोषणा, जयंत पाटील पायउतार होणार

आयफोन, आयवॉचने कळणार स्त्री गर्भवती आहे का? कृत्रिम बुद्धिमत्तेची मदत