मुंबई

मुंबईतील वाहतूककोंडी फोडण्यासाठी कोस्टल रोड प्रकल्प महत्त्वपूर्ण अश्विनी भिडे यांची माहिती

मुंबई महापालिकेचा महत्त्वाकांक्षी व माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा ड्रीम प्रोजेक्ट आहे.

प्रतिनिधी

मुंबईतील वाहतूककोंडी फोडण्यासाठी कोस्टल रोड प्रकल्प महत्त्वपूर्ण ठरणार आहे. २०१८मध्ये सुरू झालेल्या कोस्टल रोडचे ५८ टक्के काम फत्ते झाले असून, एकल स्तंभ उभारण्याचे ४० टक्के काम पूर्ण झाले आहे. त्यामुळे नोव्हेंबर २०२३ पर्यंत कोस्टल रोड मुंबईकरांच्या सेवेत आणण्यासाठी पूर्ण प्रयत्नशील असल्याचे पालिकेच्या अतिरिक्त आयुक्त अश्विनी भिडे यांनी सांगितले.

मुंबई महापालिकेचा महत्त्वाकांक्षी व माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा ड्रीम प्रोजेक्ट आहे. २०१८मध्ये कोस्टल रोडच्या कामाला सुरुवात झाली असून प्रकल्पातील एकूण १११ हेक्टरपैकी १०७ हेक्टर म्हणजे ९७ टक्के भरणी पूर्ण झाली आहे. तसेच संरक्षक भिंतीचे ७० टक्के काम पूर्ण झाले आहे. पुलांखाली बांधण्यात येणाऱ्या १७५ एकल स्तंभ खांबापैकी ७० म्हणजे ४० टक्के खांबांची उभारणी पूर्ण झाल्याचे त्यांनी सांगितले.

कोस्टल रोडसाठी जमिनीखाली १० ते ७० मीटर खोल दोन बोगदे खोदले जात असून, चार मजली इमारतीची उंची असणाऱ्या मावळ्याने २.०७२ किलोमीटरचा पहिला बोगदा खोदण्याचा टप्पा ११ जानेवारी २०२२ रोजी पार केला. तर दुसऱ्या बोगद्याच्या कामासाठी ३० मार्च रोजी मावळ्याने कूच केली आहे. छोटा चौपाटी ते प्रियदर्शनी पार्क २.०७२ किलोमीटरपर्यंत बोगदा खोदण्यात येत असून, आतापर्यंत ३९ टक्के काम पूर्ण झाले असून पुढील पाच महिन्यांत दुसऱ्या बोगद्याचे काम पूर्ण होईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

लाडक्या बहिणींना ई-केवायसी बंधनकारक; योजनेसाठी पारदर्शकतेला प्राधान्य देणार - अदिती तटकरे

मल्याळम सुपरस्टार मोहनलाल यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर; ४०० हून अधिक चित्रपटांत उमटवला अभिनयाचा ठसा!

Latur : लातूरमध्ये पावसाचा कहर; ४० तासांनंतर सापडले ५ जणांचे मृतदेह

पुणे-नाशिक महामार्गावर गॅस टँकरची गळती; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

मनसेचा आज ट्रॅफिक मार्च; नागरिकांना सहभागी होण्याचे आवाहन