मुंबई

पर्यटन विभागाकडून आंतरराष्ट्रीय गणेश महोत्सव; गणेशोत्सवाच्या पर्यटनात्मक प्रसिद्धीसाठी १९ ते २८ सप्टेंबरपर्यंत आयोजन

नवशक्ती Web Desk

मुंबई: महाराष्ट्रात सर्वत्र गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो. मुंबईत विविध सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांद्वारे साजरा करण्यात येणारा गणेशोत्सव, मोठमोठ्या व आकर्षक मूर्ती व विसर्जन सोहळा यांचे देश-विदेशातील पर्यटकांमध्ये मोठे आकर्षण आहे. राज्यातील पर्यटनाला चालना देण्यासाठी तसेच आपल्या पारंपारिक कला व संस्कृतीची ओळख देशी-विदेशी पर्यटकांना करून देण्यासाठी, तसेच गणेशोत्सवाला आंतरराष्ट्रीय स्तरावर पर्यटनात्मक प्रसिद्धी देऊन राज्यात पर्यटकांना मोठ्या प्रमाणावर आकर्षित करण्यासाठी पर्यटन संचालनालयाद्वारे दि. १९ ते २८ सप्टेंबर २०२३ या कालावधीत मुंबई, पुणे, पालघर व रत्नागिरी येथे आंतरराष्ट्रीय गणेश महोत्सवाचे आयोजन करण्यात येणार आहे.

सदर महोत्सवादरम्यान विविध राज्यातील पर्यटनाशी निगडित भागधारक, ट्रॅव्हल एजंट, टूर ऑपरेटर्स, प्रवासी पत्रकार व समाजमाध्यम प्रभावाक तसेच विदेशी वाणिज्य दूतावासाचे प्रतिनिधी यांना आमंत्रित करून त्यांना मुंबई, पुणे, पालघर व रत्नागिरी येथील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, तसेच रत्नागिरी येथील स्थानिक ग्रामस्थांच्या सहकार्याने त्यांना गणेश दर्शनाची थेट सुविधा, तसेच आपला सांस्कृतिक वैभव दाखविण्याचा अभिनव उपक्रम राबविण्यात येणार आहे.

‘गेटवे ऑफ इंडिया’ येथे सांस्कृतिक कार्यक्रम

सदर महोत्सवांतर्गत ‘गेटवे ऑफ इंडिया’ येथे श्री गणेशाच्या विविध स्वरूपांवर केंद्रित विशेष सांस्कृतिक केंद्राची उभारणी; वाळूशिल्प, मॉझेक आर्ट, स्क्रॉल आर्टचे प्रदर्शन; गेटवे ऑफ इंडियाच्या भव्य दर्शनी भागावर प्रोजेक्शन मॅपिंगच्या माध्यमातून देशभक्तीपर यशोगाथा कथन करणारे कार्यक्रम, महाराष्ट्राची पारंपारिक आदिवासी 'वारली' संस्कृतीचे दर्शन घडविणारी वारली कलेची कार्यशाळा, विविध कारागिरांद्वारे निर्मित हस्तकला वस्तूंचे कलादालन; महाराष्ट्राच्या पारंपारिक कला आणि लोककला संस्कृतीचे दर्शन घडविणारे सांस्कृतिक कार्यक्रम इत्यादि १० दिवसीय गणेशोत्सव महोत्सवांतर्गत विविध ठिकाणी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पर्यटकांसाठी आयोजित करण्यात येणार आहेत.

प्रतिक्रिया

आंतरराष्ट्रीय गणेशोत्सव हा केवळ मर्यादित आणि भव्यतेसाठीच नसून तो आपल्या महाराष्ट्राची कला व सांस्कृतिक वारसा तसेच येथील लोकांचे एकात्मतेचे दर्शन घडविण्याचे माध्यम आहे. आम्ही आपली पारंपारिक कला व सांस्कृतिक ठेवा सदर महोत्सवाच्या माध्यमातून जगासमोर सादर करण्याचा प्रयत्न करीत आहोत.

- गिरीश महाजन, पर्यटन मंत्री, महाराष्ट्र राज्य

‘गणेशोत्सव हा सण म्हणजे पारंपारिक व आधुनिक उत्सवाच्या संगमाशी सामील होण्याचा जगाला संकेत देतो. आंतरराष्ट्रीय गणेश महोत्सवाच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय पर्यटक, उत्साही आणि सांस्कृतिक जाणकार यांना महाराष्ट्राच्या विशाल आणि सांस्कृतिक महोत्सवामध्ये सहभागी होण्यास आमंत्रित करण्याचा आमचा उद्देश आहे.’

- राधिका रस्तोगी, मा. प्रधान सचिव (पर्यटन)

मुंबईत आज पाऊस बरसणार; १६ ऑक्टोबरपर्यंत महाराष्ट्रासह 'या' राज्यांत मुसळधारचा IMD चा इशारा

विधानसभेचे रणशिंग फुंकणार; दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरे-एकनाथ शिंदे भिडणार!

IND vs BAN 3rd T20I : टीम इंडिया आज क्लीन स्वीपचे 'तोरण' बांधणार; 'या' ४ खेळाडूंना संधी मिळणार?

रतन टाटांचा वारसदार मिळाला; नोएल टाटा बनले टाटा ट्रस्टचे चेअरमन

इस्रायलचा लेबनॉनमधील संयुक्त राष्ट्रांच्या इमारतीवर हल्ला; भारताकडून चिंता व्यक्त