मुंबई

भांडुपमधील बालकाच्या मृत्यूची चौकशी; उच्च न्यायालयात याचिका

भांडुप पश्चिम गावदेवी परिसरात उघड्या नाल्यात पडून १८ महिन्यांच्या बालकाचा गेल्या रविवारी मृत्यू झाला होता. याप्रकरणी पालिकेचे उपायुक्त संतोष कुमार धोंडे हे चौकशी करून अहवाल देणार असल्याची माहिती पालिका प्रशासनाकडून देण्यात आली.

Swapnil S

मुंबई : भांडुप पश्चिम गावदेवी परिसरात उघड्या नाल्यात पडून १८ महिन्यांच्या बालकाचा गेल्या रविवारी मृत्यू झाला होता. याप्रकरणी पालिकेचे उपायुक्त संतोष कुमार धोंडे हे चौकशी करून अहवाल देणार असल्याची माहिती पालिका प्रशासनाकडून देण्यात आली.

गावदेवी परिसरातील कृष्णा गुप्ता हा चिमुकला खेळता खेळता झाकण नसलेल्या नाल्यात पडला. रविवारी सायंकाळच्या सुमारास ही घटना घडली. बराच वेळ झाला तरी शोध न लागल्याने त्याच्या कुटुंबीयांनी भांडुप पोलिसांत मुलगा हरवल्याची तक्रार नोंदवली होती. दीड तासानंतर हा मुलगा नाल्यात मृतावस्थेत आढळला. नाकातोंडात पाणी आणि घाण गेल्याने त्याचा मृत्यू झाल्याचे समोर आले होते.

Maharashtra Assembly Elections Results 2024 LIVE: महाराष्ट्राचा महानिकाल! एकाच क्लिकवर बघा कल आणि निकाल

अपक्ष, बंडखोरांसाठी रस्सीखेच; महायुती, महाआघाडीत खलबते

राहुल गांधी, खर्गे यांनी माफी मागावी, अन्यथा कारवाईला सामोरे जावे; विनोद तावडे यांची नोटीस

...तोपर्यंत मतमोजणी केंद्र सोडू नका; शरद पवारांचा उमेदवारांना आदेश

झारखंडमध्ये आज मतमोजणी