मुंबई

मुंबईत शिवसेनेला हलक्यात घेणे चुकीचे ठरेल - नितेश राणे

आजही बाळासाहेबांचे विचार मनाशी बाळगत समाजकारण करत आहे

गिरीश चित्रे

“शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचा दरारा मुंबईत वेगळाच होता; मात्र आताची शिवसेना बाळासाहेबांच्या नावावर थोडीफार टिकली आहे. बाळासाहेबांचे कडवे शिवसैनिक बाळासाहेबांच्या नावावर शिवसेनेलाच मतदान करू शकतात. त्यामुळे मुंबईत शिवसेनेला हलक्यात घेणे चुकीचे ठरेल,” असे मत भाजप आमदार नितेश राणे यांनी व्यक्त केले. दरम्यान, मुंबई महापालिकेला यंदा १३४ वर्षें पूर्ण होत असल्याने आगामी निवडणुकीत १३४ नगरसेवक निवडून येतील आणि महापालिकेत कमळच फुलणार, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

“बाळासाहेबांच्या शिवसेनेसोबत वर्षानुवर्षे जोडलो होता. आजही बाळासाहेबांचे विचार मनाशी बाळगत समाजकारण करत आहे; मात्र आताच्या शिवसेना नेत्यांचा शून्य अभ्यास आहे. मुंबई महापालिकेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सोबत सेनेतील काही नेते ऊठबस करतात, त्यामुळे मुंबई महापालिकेतील वरिष्ठ अधिकारी शिवसेना नगरसेवकांनाच जुमानत नव्हते, ही मोठी शोकांतिका आहे. २०१९ पर्यंत शिवसेना-भाजप एकत्र निवडणुका लढत होते किंवा वेगवेगळे लढले तरी विजयानंतर दोन्ही पक्ष एकत्र येत होते. २०१९पर्यंत शिवसेना-भाजपचा मतदार कमळ किंवा धनुष्यबाणावर शिक्का मारत होता; मात्र आता राज्यात शिंदे व फडणवीस यांचे सरकार स्थापन झाले असून, धनुष्यबाण इतिहास जमा होईल. त्यामुळे शिवसेनेचा खरा मित्रपक्ष म्हणून शिवसेनेचा मतदारही भाजपलाच मतदान करणार,” असा विश्वास नितेश राणे यांनी व्यक्त केला.

२०१४ ते २०१९ या काळात फडणवीस सरकारने जी कामे केली, ती लोकांच्या लक्षात आहेत. आरेतील मेट्रो कारशेडबाबत मविआला काही करता आले नाही. राज्यातील सत्तेतून पायउतार होताच आदित्य ठाकरेंना आरेतील मेट्रो कारशेडचा प्रश्न दिसला आणि काही लोकांबरोबर आंदोलनास गेले. पवई येथील सायकल ट्रॅक या सगळ्यांचा विरोध होत असताना आदित्य ठाकरेंना तो विरोध दिसला नाही, असा टोला नितेश राणे यांनी लगावला.

मुंबईसह २९ महानगरपालिकांच्या निवडणुकांची घोषणा; आजपासून आचारसंहिता लागू

BMC Election : २२७ जागांसाठी मुंबईत मतदान; महापालिका निवडणुकांची अधिसूचना जाहीर

'नाव बदलणे ही लाजिरवाणी गोष्ट...'; ‘विकसित भारत’च्या नावाखाली MGNREGA च्या नावात बदल केल्याने विरोधक आक्रमक

कल्याणमध्ये रॅपिडो चालकाचा धक्कादायक प्रकार; विनयभंगाच्या प्रकरणानंतर रॅपिडो, ओला आणि उबरवर टांगती तलवार

‘वोट चोर, गद्दी छोड़’ रॅलीवरून संसदेत गोंधळ; दोन्ही सभागृहांचे कामकाज तहकूब, भाजपचा तीव्र आक्षेप