मुंबई

जय श्रीराम बोलला नाही तरुणावर प्राणघातक हल्ला

आरोपीविरुद्ध मारहाणीसह शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा नोंदविला

नवशक्ती Web Desk

मुंबई : जय श्रीराम बोलला नाही म्हणून एका ३४ वर्षांच्या तरुणावर चार परप्रांतिय तरुणांनी प्राणघातक हल्ला केल्याची घटना कांदिवली परिसरात उघडकीस आली आहे. या हल्लत सिद्धार्थ किसन अंगुरे हा मराठी तरुण गंभीररीत्या जखमी झाला होता. त्याच्या तक्रारीनंतर कुरार पोलिसांनी सुरज तिवारी, अरुण पांडे, पंडित आणि राजेश रिक्षावाला अशी या चौघांविरुद्ध गुन्हा नोंदविला आहे. ते चौघेही उत्तरप्रदेशचे रहिवाशी असल्याचे बोलले जाते. सिद्धार्थ अंगुरे हा कांदिवलीतील क्रांतीनगर येथे राहत असून, सोमवारी रात्री साडेअकरा वाजता तो कामावरून घरी जात होता. यावेळी त्याला चार तरुणांनी थांबवून जय श्रीराम बोल असे सांगितले; मात्र त्याने जय श्रीराम बोलण्यास नकार दिला. याच कारणावरून या चौघांनी त्याला अश्‍लील शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी देत त्याला हाताने तसेच लाथ्याबुक्यांनी बेदम मारहाण केली होती.

हा प्रकार त्याच्या भावाला समजताच तो त्याच्या मित्रासोबत तिथे आला. यावेळी त्यांनी चौघांची समजूत काढून त्याला बाहेर करण्याचा प्रयत्न केला. मारहाणीत सिद्धार्थ अंगुरे हा गंभीररीत्या जखमी झाला. त्यामुळे त्याला तातडीने कांदिवलीतील शताब्दी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तिथे प्राथमिक औषधोपचार केल्यानंतर त्याला सोडून देण्यात आले. त्यानंतर त्याने घडलेला प्रकार कुरार पोलिसांना सांगितला. त्याच्या तक्रारीवरून पोलिसांनी चारही आरोपीविरुद्ध मारहाणीसह शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा नोंदविला आहे.

मुंबईसह राज्यातील कबुतरखाने बंद होणार; उद्योग मंत्री उदय सामंत यांची माहिती

बाळ चोरीला गेल्यास रुग्णालयाची नोंदणी रद्द होणार; राज्य सरकारचा निर्णय

मुंबई, दिल्ली मेट्रो शहरांचा झगमगाट आता संधीच्या नकाशावर मागे! आता Freshers साठी चेन्नई ठरतंय पगाराचा नवा 'हॉटस्पॉट'

आता २४ तास वाळू वाहतूक; GPS, CCTV बसवणे बंधनकारक; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची सभागृहात घोषणा

सरकारी यंत्रणा शेतकऱ्यांची मारेकरी! महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर राहुल गांधी आक्रमक