मुंबई

जिओ मार्टचा ‘त्योहार रेडी सेल’ सुरु; वस्तुंवर ऑफर, विशेष सवलती

जिओमार्ट ग्राहकांना एसबीआयच्या डेबिट कार्डस‌्वर खरेदी करणाऱ्यांना अतिरिक्त सवलत या सेलमध्ये देणार आहे.

वृत्तसंस्था

रिलायन्स रिटेलच्या जिओ मार्ट या भारतातील आघाडीच्या ई-मार्केटप्लेसवर महिनाभर चालणारा ‘सेल’ जाहीर करण्यात आला आहे. सणोत्सवासाठी ‘त्योहार रेडी सेल’ आणि फेस्टिवहल सेल’ हे दोन सेल २३ सप्टेंबरपासून सुरु झाले असून २३ ऑक्टोबरपर्यंत चालणार आहे. ग्राहक इलेक्ट्रॉनिक्स, होम आणि किचन, फॅशन, लाईफस्टाईल, ब्युटी, एफएमसीजी आणि ग्राहकोपयोगी अशा विविध वर्गवारीत ८० टक्के सवलत मिळणार आहे. याशिवाय, ब्रँडेड आणि रिलायन्स रिटेल मालकीच्या ब्रँडच्या वस्तुंवर बँकांच्या ऑफर, विशेष सवलती देण्यात येत आहे.

जिओमार्ट ग्राहकांना एसबीआयच्या डेबिट कार्डस‌्वर खरेदी करणाऱ्यांना अतिरिक्त सवलत या सेलमध्ये देणार आहे. याशिवाय, स्थानिक कलाकारांच्या वेगवेगळ्या वस्तू, हस्तकला विक्रीसाठी उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. त्यात हातमागावर बनवलेली साडी, परंपरागत दागिने आदी उपलब्ध असणार आहे.

या घोषणेवर प्रतिक्रिया देतााना संदीप वारागंटी, सीईओ, जिओ मार्ट म्हणाले की, देशातील सर्वात मोठे मार्केटप्लेस असल्याने आम्ही डिजिटल रिटेल सिस्टीमवर देशातील लघुउद्योग, छोटे आणि मध्यम व्यापारी, स्थानिक कलाकार, महिला व्यावसायिक यांच्या वस्तूंच्या विक्रीसाठी व्यासपीठ उपलब्ध करुन देत त्यांना आर्थिक बळ देण्याचा प्रयत्न केला आहे. फ्लॅश सेल दररोज तीन तास असणार असून स्मार्टफोन ६९९९ रुपयांपासून मिळणाार आहे. एसबीआयच्या डेबिट कार्डवर १ हजार रुपयांवरील वस्तूंच्या खरेदीवर अतिरिक्त १० टक्के रोख परत मिळणार आहे.

‘एक है, तो सेफ है’ हे वोट जिहादला प्रत्युत्तर; देवेंद्र फडणवीस यांनी केले योगी, मोदींच्या घोषणांचे समर्थन

महायुतीनेच घेतला ‘बटेंगे’चा धसका; पंकजा मुंडे, अशोक चव्हाण यांनी व्यक्त केली नापसंती

१८ ते २० नोव्हेंबर शाळांना सुट्टी; शिक्षण सचिवांकडून सर्व शाळांना विनंतीपत्र

वरळी मतदारसंघात तिरंगी लढत; आदित्य ठाकरेंसमोर शिंदे सेना आणि मनसेचे आव्हान

मतदानाच्या दिवशी मेट्रो, बस उशिरापर्यंत धावणार! BMC आयुक्त भूषण गगराणी यांचे निर्देश