JNPT येथून पहिली 'डबल-स्टॅक लाँग-हॉल' कंटेनर ट्रेन धावली; ३६० टीईयू माल घेऊन ४२२ किमीचा प्रवास वेळ वाचणार; पोर्टवरील गर्दी कमी होणार 
मुंबई

JNPT येथून पहिली 'डबल-स्टॅक लाँग-हॉल' कंटेनर ट्रेन धावली; ३६० टीईयू माल घेऊन ४२२ किमीचा प्रवास वेळ वाचणार; पोर्टवरील गर्दी कमी होणार

भारतीय रेल्वेने शुक्रवारी मुंबईतील जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट (जेएनपीटी) येथून आपली पहिली 'डबल-स्टॅक लॉग-हॉल' कंटेनर ट्रेन यशस्वीपणे चालवली. ही ट्रेन तब्बल ३६० टीईयू (वेंटी-फूट इक्विव्हॅलेंट युनिट्स) माल घेऊन सुमारे ४२२ किलोमीटरचा प्रवास करत वडोदरा विभागातील वर्नामा येथील कॉनकॉरच्या 'गतिशक्ती मल्टीमॉडेल कार्गो टर्मिनल' वर पोहोचली.

प्रतिनिधी

अभिषेक पाठक/मुंबई

भारतीय रेल्वेने शुक्रवारी मुंबईतील जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट (जेएनपीटी) येथून आपली पहिली 'डबल-स्टॅक लॉग-हॉल' कंटेनर ट्रेन यशस्वीपणे चालवली. ही ट्रेन तब्बल ३६० टीईयू (वेंटी-फूट इक्विव्हॅलेंट युनिट्स) माल घेऊन सुमारे ४२२ किलोमीटरचा प्रवास करत वडोदरा विभागातील वर्नामा येथील कॉनकॉरच्या 'गतिशक्ती मल्टीमॉडेल कार्गो टर्मिनल' वर पोहोचली. २१ ऑगस्टला संध्याकाळी ७ वाजता ही ट्रेन जेएनपीटी येथून रवाना झाली होती. पश्चिमेकडील रेल्वे नेटवर्कवर मालवाहतूक क्षमता वाढवण्याच्या दृष्टीने हे एक अत्यंत महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे.

दोन गाड्या जोडून तयार केली 'लॉग-हॉल'

या लाँग-हॉल संरचनेत दोन डबल-स्टॅक रेक (रॅक) एकत्र जोडून एकच ट्रेन तयार करण्यात आली होती. पहिला रेक इंजिन क्रमांक ६०३११ द्वारे खेचला गेला, ज्यामध्ये ४५+१ कंटेनर आणि १,८१७ टन वजन होते. दुसरा (मागील) रेक: इंजिन क्रमांक २४६९० द्वारे खेचला गेला, ज्यामध्ये ४५+१ कंटेनर आणि २,१०५ टन वजन होते. एकूण क्षमता : या दोन्ही रेक्सच्या माध्यमातून एकाच वेळी ३६० टीईयू क्षमतेची मालवाहतूक करण्यात आली.

वाहतुकीत सुलभता

एकाच फेरीत मोठ्या प्रमाणावर मालाची वाहतूक शक्य झाल्यामुळे रेल्वे फेऱ्यांची संख्या कमी होईल आणि रेल्वे मार्गांच्या क्षमतेचा पुरेपूर वापर करता येईल. यामुळे वेगळ्या गाड्या चालवण्याच्या तुलनेत इंजिन आणि कंटेनर व्हेगनची आवश्यकता कमी भासणार आहे.

मालाची जलद ने-आण होणार

पोर्ट आणि फ्रेट टर्मिनल्ससाठी याचा थेट फायदा म्हणजे मालाची जलद विल्हेवाट होणे हा आहे. एकाच वेळी अधिक कंटेनर वाहून नेल्यामुळे पोर्टवरील कंटेनरचा मुक्काम कमी होईल आणि गर्दी नियंत्रणात येईल. यामुळे एकूण वाहतुकीचा वेळ कमी होऊन माल देशांतर्गत भागांत वेगाने पोहोचण्यास मदत होईल.

(संबंधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

Mumbai : महापौर बंगल्यात काय बदल केला? ठाकरे सेना, काँग्रेस करणार पाहणी

आता कांदाही रडवणार; कांदा दरातील तेजी दोन महिने कायम राहण्याचा अंदाज

Mumbai : महापालिका शाळांच्या विद्यार्थ्यांची केशव सृष्टीतील शैक्षणिक सहल वादात

Pune : मनुस्मृतीविरुद्ध एल्गार; राहुल गांधी यांनी 'छात्रों की गुंज' कार्यक्रमात साधला हजारो तरुणींशी संवाद

अभिजीत दीपके यांच्या विरोधात गुन्हा दाखल; शासकीय शाळेत विनापरवाना प्रवेश, शिक्षकांना धमकी