Mumbai : टी-शर्टवरून हरवलेल्या मुलाची ओळख पटली 
मुंबई

Mumbai : टी-शर्टवरून हरवलेल्या मुलाची ओळख पटली

मेघवाडीतील गुरुवारी दुपारी घरातून बेपत्ता झालेल्या एका आठ वर्षांच्या मुलाची अवघ्या दोन तासांत त्याच्या पालकांशी भेट घडवून आणण्यात आली. एका पोलीस हवालदाराने त्या मुलाच्या टी-शर्टवर छापलेल्या मुंबई मनपा शाळेच्या लोगोवरून ओळख पटवली. हा मुलगा काहीही बोलू शकत नसतानाही जोगेश्वरी पोलिसांनी कुटुंबाचा यशस्वीपणे शोध घेतला.

Swapnil S

मेघा कुचिक/मुंबई :

मोहम्मद अन्सारी हा मुलगा गुरुवारी दुपारी घरातून निघून गेला होता. त्यानंतर साधारण एका तासाने तो जोगेश्वरी पूर्व येथील सुभाष रोडवर रडत उभा होता. त्या भागात गस्त घालत असलेले पोलीस हवालदार जगन्नाथ मिसाळ यांनी मुलाला पाहिले. मात्र, मुलगा कोणतीही माहिती सांगू शकला नाही. तो फक्त 'अब्बा' आणि 'अम्मा' दोन शब्द उच्चारत होता. या मुलाच्या टी-शर्टवर 'बृहन्मुंबई महानगरपालिका हिंदी शाळा, जोगेश्वरी (पूर्व)' असे छापलेले होते.

हाच धागा पकडून हवालदाराने तत्काळ त्या शाळेत जाऊन तेथील शिक्षक लक्ष कुमार नांदेश्वर यांची भेट घेतली. मात्र, तो विशेष मूल असल्याने आम्ही त्यांना विशेष शाळेत जाण्याचा सल्ला दिला होता आणि त्या मुलाला एक टी-शर्ट भेट म्हणून दिला होता, असे मिसाळ म्हणाले. पथकाने जोगेश्वरी येथील 'सोपान स्पेशल इंग्लिश मीडियम स्कूल'मधून त्या मुलाच्या प्रवेशाच्या नोंदी शोधून काढल्या. शिक्षिका नेहा तेंडुलकर यांनी मुलाला ओळखून त्याच्या पालकांशी संपर्क साधला.

(संबंधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

मुंबई-सावंतवाडी दरम्यान नवीन एक्स्प्रेस धावणार; चाकरमानी, पर्यटकांची मोठी सोय होणार

FIR ऑनलाइन अपलोड करण्यात दिरंगाई; सामाजिक कार्यकर्त्यांकडून कारवाईची मागणी ओशिवरा, जुहू पोलीस ठाण्यांवर आरोप

अँटिलिया बॉम्ब आणि मनसुख हिरेन हत्या प्रकरण : वाझे, प्रदीप शर्मांवर आरोप निश्चित

राज्यासाठी रुग्णवाहिका धोरण आखणार; आपत्कालीन सेवांना मिळणार नवी दिशा

...तर पेट्रोल १२५ रुपयांवर पोहोचले असते; इथेनॉलमिश्रित पेट्रोलच्या धोरणाचे केंद्राने केले समर्थन