Mumbai : जुहू येथे इमारतीत अग्निभडका; गायक तलत अझीझ यांच्यासह पाच जखमी 
मुंबई

Mumbai : जुहू येथे इमारतीत अग्निभडका; गायक तलत अझीझ यांच्यासह पाच जखमी

जुहू परिसरात शुक्रवारी रात्री ११ वाजता एका निवासी इमारतीला लागलेल्या आगीत ज्येष्ठ गायक तलत अझीझ यांच्यासह पाच जण जखमी झाले. आगीनंतर निर्माण झालेल्या धुरामुळे गुदमरल्याने त्यांना त्रास झाला. सर्व जखमींना तातडीने भारतीया आरोग्य निधी रुग्णालयात दाखल करण्यात आले.

Swapnil S

मुंबई : जुहू परिसरात शुक्रवारी रात्री ११ वाजता एका निवासी इमारतीला लागलेल्या आगीत ज्येष्ठ गायक तलत अझीझ यांच्यासह पाच जण जखमी झाले. आगीनंतर निर्माण झालेल्या धुरामुळे गुदमरल्याने त्यांना त्रास झाला. सर्व जखमींना तातडीने भारतीया आरोग्य निधी रुग्णालयात दाखल करण्यात आले.

इस्कॉन मंदिराजवळ तळ अधिक पाच मजली निवासी इमारत आहे. या इमारतीच्या तळमजल्यावरील सुमारे १० बाय १५ फुटांच्या खोलीत आग लागल्याची घटना घडली. काही वेळातच ही आग वाऱ्यासारखी पसरली आणि इमारतीत धुराचे लोट पसरले. त्यामुळे इमारतीच्या वरच्या मजल्यांवरील रहिवासी अडकले होते. शुक्रवारी रात्री सुमारे १०.५६ वाजता आग लागल्याची माहिती मुंबई अग्निशमन दलाला मिळताच जवान घटनास्थळी दाखल झाले. अथक प्रयत्नानंतर रात्री सुमारे १२ च्या सुमारास आग नियंत्रणात आली. घटनास्थळी पोलीस, अदानी इलेक्ट्रिसिटी तसेच संबंधित महापालिका विभागाचे कर्मचारीही दाखल झाले होते.

या दुर्घटनेत तलत अझीझ, शाहीन अझीझ, अदनान अझीझ, बिना अझीझ आणि सिकंदर सिंह हे जखमी झाले. धुरामुळे गुदमरल्याने त्यांना त्रास झाल्याचे रुग्णालय प्रशासनाकडून सांगण्यात आले. तलत अझीझ आणि शाहीन अझीझ यांना अतिदक्षता विभागात दाखल केले होते. त्यांची प्रकृती स्थिर होती.

अदनान अझीझ यांची प्रकृती सुरुवातीला गंभीर असल्याचे सांगण्यात आले होते. बिना अझीझ यांनाही अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले होते, तर सिकंदर सिंह यांच्यावर सर्वसाधारण वॉर्डमध्ये उपचार सुरू होते. दरम्यान, उपचारानंतर पाचही जखमींना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला.

(संबंधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

शेकोटीसाठी कचरा जाळल्यास पाच हजारांचा दंड! प्रदूषण रोखण्यासाठी ठाणे महापालिकेचा दणका

झोपेचं सोंग घेऊन महिलेशी अश्लील चाळे; जाग येताच महिलेने लगावली थप्पड, रुग्णालयातील VIDEO व्हायरल

सोशल मीडियावर GTA 6 फोटो ट्रेंडची धूम! तुमचाही फोटो दिसेल व्हाइस सिटी पोस्टरसारखा; जाणून घ्या सोपी ट्रिक

UP Viral Video : घटस्फोट न घेताच दुसऱ्या लग्नाचा घाट; बोहल्यावर चढण्याआधीच नवरदेव पोलिसांच्या ताब्यात, पहिल्या पत्नीने उधळला डाव

Dombivli Crime : ७ वर्षांचं प्रेम संपलं अन् तरुणाचा संताप अनावर; पेट्रोल टाकून माजी प्रेयसीचं घर पेटवण्याचा प्रयत्न