मुंबई

Mumbai : जुहू गल्ली पुनर्विकास प्रकल्प ‘रिलायन्स’कडे

अंधेरी (पश्चिम) येथील १०१.३६ एकर क्षेत्रफळाच्या जुहू गल्ली झोपडपट्टी समूह पुनर्विकास प्रकल्पासाठी झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाने (एसआरए) बुधवारी निविदा प्रक्रिया पूर्ण केली. पारदर्शक आणि स्पर्धात्मक निविदा प्रक्रियेनंतर रिलायन्स इंडस्ट्रीज समूहाची उपकंपनी असलेल्या आर४आयआर रिएल्टी प्रायव्हेट लिमिटेड यांच्या नेतृत्वाखालील कन्सोर्टियमची यशस्वी निविदादार म्हणून निवड करण्यात आली.

Swapnil S

मुंबई : अंधेरी (पश्चिम) येथील १०१.३६ एकर क्षेत्रफळाच्या जुहू गल्ली झोपडपट्टी समूह पुनर्विकास प्रकल्पासाठी झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाने (एसआरए) बुधवारी निविदा प्रक्रिया पूर्ण केली. पारदर्शक आणि स्पर्धात्मक निविदा प्रक्रियेनंतर रिलायन्स इंडस्ट्रीज समूहाची उपकंपनी असलेल्या आर४आयआर रिएल्टी प्रायव्हेट लिमिटेड यांच्या नेतृत्वाखालील कन्सोर्टियमची यशस्वी निविदादार म्हणून निवड करण्यात आली.

जुहू गल्ली समूह पुनर्विकास प्रकल्प हा मुंबईतील आतापर्यंत हाती घेण्यात आलेल्या सर्वात मोठ्या आणि पहिल्याच झोपडपट्टी समूह पुनर्विकास उपक्रमांपैकी एक मानला जात असून, या प्रकल्पांतर्गत पात्र झोपडपट्टीधारकांसाठी २८ हजारांहून अधिक पुनर्वसन घरे उभारली जाणार आहेत.

या निविदा प्रक्रियेत रिलायन्स, जेएसडब्ल्यू आणि शापूरजी पालोनजी समूह या देशातील आघाडीच्या उद्योगसमूहांनी सहभाग घेतला होता. राज्य सरकारच्या क्लस्टर पुनर्विकास धोरणांतर्गत हा प्रकल्प राबविण्यात येत आहे. पारंपरिक पुनर्वसन योजनांद्वारे विकसित करणे कठीण ठरलेल्या मोठ्या झोपडपट्टी समूहांच्या पुनर्विकासाला गती देणे हा या धोरणाचा उद्देश आहे.

भाड्यापोटी ७०० कोटी

यशस्वी निविदादाराला झोपडपट्टीधारकांचे प्रलंबित भाडे तसेच पुढील दोन वर्षांसाठी सुमारे ७०० कोटी रुपयांच्या संक्रमणकालीन भाडे देयकांची हमी एसआरएकडे जमा करावी लागणार आहे. याशिवाय, आणखी एका वर्षाच्या भाड्याची रक्कम पोस्ट-डेटेड धनादेशांच्या स्वरूपात जमा करावी लागेल. तसेच, यशस्वी निविदादाराला १०० कोटी रुपयांची कामगिरी हमी (परफॉर्मन्स गॅरंटी) देखील एसआरएकडे जमा करावी लागणार आहे.

Mumbai : कोस्टल रोडवर भरधाव BMW पुलावरून कोसळली; तिघांचा जागीच मृत्यू, अपघाताचा थरार CCTV मध्ये कैद

UPI व्यवहारांवरील शुल्क हा नागरिकांसाठी 'डिजिटल सापळा'; राज ठाकरेंचा केंद्र सरकारवर हल्ला

भारताचा GDP ३८ लाख कोटी डॉलरवर पोहोचेल; राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांचा विश्वास

Mumbai : पूरमुक्तीसाठी महापालिकेचा ॲक्शन प्लॅन; १३ हजार कोटींचा खर्च अपेक्षित

Mumbai : शस्त्रक्रियेदरम्यान मज्जातंतूंचे नुकसान टाळण्यास मदत; पालिका रुग्णालयांत 'इंट्रा ऑपरेटिव्ह नर्व्ह मॉनिटरिंग' प्रणाली