विजय गेहिल
मुंबई

'काळा घोडा फेस्टिवल' : कलाप्रेमींसाठी पर्वणी; बघा डोळ्यांचं पारणं फेडणाऱ्या कलाकृती...

Swapnil S
दरवर्षी मुंबईकर ज्या फेस्टिवलची आतुरतेने वाट पाहतात तो मुंबईतील सर्वात मोठा आणि आकर्षक फेस्टिव्हल म्हणजे 'काळा घोडा आर्ट फेस्टिव्हल'. हा बहुप्रतिक्षित फेस्टिवल २५ जानेवारीपासून सुरू झाला आहे.
दरवर्षी हा फेस्टिवल जानेवारी ते फेब्रुवारीच्या दरम्यान मुंबईच्या फोर्ट या भागात असतो. प्रतिभावंत कलाकारांच्या कल्पनेतून साकारलेल्या सृजनशील कलाकृती पाहण्यासाठी कलप्रेमींची गर्दी झाली आहे.
दरवर्षीप्रमाणे याही वर्षी काळाघोडा फेस्टिवलमध्ये कलाप्रेमींना आकर्षक कलाकृती पाहायला मिळत आहेत.
देशाच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या कलाकारांच्या कलाकृतींच्या विक्रीसाठी १०० हुन अधिक दालने उभारण्यात आली आहेत.
या फेस्टिवलचा आनंद तुम्ही अगदी मोफत घेऊ शकता. यासाठी तुम्हाला कोणतेही शूल्क आकारले जाणार नाही.
१९९९ मध्ये काळा घोडा संस्थेने हा फेस्टिव्हल सुरू केला होता. यंदा या फेस्टिवलचे रौप्य महोत्सवी वर्ष आहे.
रौप्य महोत्सवच्या निमीत्ताने यावर्षी काळा घोडा असोसिएशनच्या वतीने 'सिल्वर घोडा' ही थीम बनवली गेली आहे. दादासाहेब फाळके चित्रनगरीच्यावतीने महोत्सवात सिने निर्मितीसाठी लागणाऱ्या तांत्रिक टाकाऊ साहित्यातून घोड्याची प्रतिकृती साकारण्यात आली आहे. या प्रतिकृतीला सिल्वर स्क्रीन सिनेमॅटिक घोडा असे नाव देण्यात आले आहे.
काळा घोडा येथे तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारच्या कलाकृतींचे दर्शन तसेच लहान मुलांना आकर्षित करणाऱ्या वेगवेगळ्या कला पाहायला मिळणार आहेत.
यंदा २ फेब्रुवारीपर्यंत हा महोत्सव सुरु राहणार असून या महोत्सवात विदेशी कलाप्रेमीही सहभागी झाले आहेत.

सी. पी. राधाकृष्णन नवे उपराष्ट्रपती; राधाकृष्णन यांना ४५२, तर रेड्डी यांना ३०० मते, विरोधकांची १४ मते फुटली

आरक्षणाचे राजकारण हेच राजकारणाचे आरक्षण

कामगारांचे वाजणार बारा!

आजचे राशिभविष्य, १० सप्टेंबर २०२५ : जाणून घ्या तुमच्या दिवसाचे ग्रहसंकेत

Gen-Z पुढे अखेर नेपाळ सरकार कोसळलं; 'या' दोन मिलेनियल नेत्यांनी नेपाळचे पालटले चित्र